शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST

एका नागरिकाने चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आंदोलन सुरु केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही केवळ शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दरोज मूल शहरातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवायचे, अशा स्वरुपाच्या या आंदोलनाची आता प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेतले. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देरस्त्यांवर धुमाकूळ : अपघाताच्या घटनांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमूल: शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली असून डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर मुक्तपणे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शहरात दररोज अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करुनही नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाहीत. त्यामुळे एका नागरिकाने चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आंदोलन सुरु केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही केवळ शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दरोज मूल शहरातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवायचे, अशा स्वरुपाच्या या आंदोलनाची आता प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेतले. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.शहरात डुकरांची संख्या इतकी प्रचंड वाढली की, डुकरांचे कळप नागरिकांच्या घराच्या आवारात प्रवेश करुन धुडगूस घालत आहेत. ही डुकरे इतकी निडर बनली आहेत की, लहान मुलांवर हल्याचा देखील प्रयत्न करीत आहेत. एका महिन्यांपूर्वी राजेंद्र प्रसाद जुनी वस्ती परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेवर डुकरांचा कळप चालून आला होता. परंतु पालकांनी तिला डुकरांच्या तावडीतून सोडविले होते. डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर सैरावैरा धावत असतात. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांचे अपघात घडत आहेत. एका महिन्यात किमान १० ते १५ अपघात डुकरांमुळे झाले आहेत. यापूर्वी डुकरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने कंत्राटदार नेमला होता. काही दिवस डुकरांना पकडून दूर नेऊन सोडण्यात आले. परंतु ही मोहीम मध्येच थांबली. मोकाट डुकरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असताना नगरपालिका मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. जनभावना लक्षात घेऊन एका नागरिकांने डुकरांच्या बंदोबस्तासाठी व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन सुरु केले आहे.नागरिकांनी आपल्या परिसरातील डुकरांच्या कळपाचे फोटो माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावे, असे आवाहनाची त्यांनी नागरिकांना केले आहे.