शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खासदार साहेब दिसले काय? नागरिकांचा प्रतिप्रश्न

By admin | Updated: March 12, 2015 00:43 IST

लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले.

ब्रह्मपुरी : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ते कधी या शहरात फिरकलेलेच नाही. त्यामुळे येथील नागरिक एकमेकांना प्रतिप्रश्न करीत आहेत, तो म्हणजे खासदार साहेब दिसले काय?गडचिरोली लोकसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. दिल्लीवरुन मूळ गावी गडचिरोलीला जाताना ब्रह्मपुरीवरुनच जावे लागत असते तरी, खासदार साहेब ब्रह्मपुरीत कधीच दिसले नाही. खासदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून हजारो मतांची लिड घेऊन विजयी झाले. मात्र विजयाच्या रॅलीनंतर खासदार साहेबांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. खाजगी एक दोन कार्यक्रम वगळता सार्वजनिक कार्यक्रम किंवा उपक्रम दिसून आले नाही. दिल्लीत व महाराष्ट्रात सत्ता खासदारांच्या पक्षाची आहे. परंतु, अनेक प्रश्न सातत्याने रखडली आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे ब्रह्मपुरीचा रेल्वे प्लॉटफार्म कमी उंचीचा आहे. हे काम केंद्राशी संबंधित असूनही व सत्ता असूनही मार्गी का लागत नाही, हा मोठा प्रश्न आहे. रेल्वे प्लॉटफार्ममुळे अनेक नागरिकांचा हिरमोड होत आहे. स्त्रिया, नागरीक, लहान मुले प्रवास करण्याचे टाळतात. कारण रेल्वेचे प्लॉटफॉर्म उंच झाले नाही व अपघात होण्याची शक्यता असते. खासदार साहेब ब्रह्मपुरीला तुम्ही दिसले नाही तर मतदार सहन करतील पण किमान तुमच्या कार्यातून प्लॉटफार्मची उंची वाढली पाहिजे या अपेक्षेत मतदार तुमची आठवण करुन खासदार साहेब दिसले काय, असा उपाक्षसाने प्रश्न विचाराला जात आहे. खासदार साहेबांच्या क्षेत्रात सध्या भाजपाचे आमदार नाही त्यामुळे गांधाराची भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. परंतु कर्णधार अलिप्त असेल तर विकासकामे, पक्षबांधणी, कार्यकत्यांना दिलासा कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरीत अनेक रस्ते, नाल्या, नगरपरिषदेच्या अखत्यारित आहेत. परंतु, आपण येऊन निधी दिला तर अनेक नगर विकासकामांना गती मिळेल. नगरपालिकेतील सत्ता पक्षाला समाधान वाटेल. काही महत्वाच्या कामात गोसीखुर्द धरणाचे बांधकाम अपूर्ण आहे. गोसीखुर्द धरणाची स्थिती फार वाईट आहे. अशा स्थितीत खासदार अशोक नेते यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)