शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:51 IST

दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देरूपेश घागी यांचे प्रतिपादन : माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रूपेश घागी यांनी केले.तालुक्यातील माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी काळे होते. तर प्रमुक्ष अतिथी म्हणून रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. चौधरी, प्राचार्य एम. एस. शेख, केंद्रप्रमुख किशोर कामडी, अनिल काळे, पर्यवेक्षक दडमल उपस्थित होते.किसन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माढेळीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलतना प्रा. घागी पुढे म्हणाले, फुकट मिळणाºया वस्तुंची माणसाल किंमत नसते. आज पाणी फुकटात मिळत असल्याने त्याचा गैरवापर आणि अपव्यवय सुरू आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांमध्ये देशाला बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकीकडे पाणीसाठा कमी होत असताना लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असतानाही पाणी अपुरे पडत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरेल, अशा उपाययोजना करणे, धरणासारख्या जलाशयातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

टॅग्स :Waterपाणी