वरोरा प्रहारची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:09+5:302020-12-04T04:55:09+5:30

प्रहारचे संस्थापक नामदार कडू यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या पूर्व विदर्भाच्या बैठकीत गजु कुबडे यांची ...

Warora attack review meeting | वरोरा प्रहारची आढावा बैठक

वरोरा प्रहारची आढावा बैठक

प्रहारचे संस्थापक नामदार कडू यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या पूर्व विदर्भाच्या बैठकीत गजु कुबडे यांची चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली .जिल्हा कार्यकारणी व पक्षवाढी संदर्भात पक्षप्रमुखाने दिलेल्या आदेशानुसार कुबडे यांनी जिल्हा दौरा सुरू केला असून चिमूर, नागभीड, चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर व वरोरा दौऱ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगदीश लांडगे, सोनेगाव सरपंच सुरेश कुत्तरमारे, चिनोरा येथील उपसरपंच महेंद्र बदकी, शुभम नरडे, निखिल मांडवकर आदींनी सेवा बंधन बांधून पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रहारसेवक आशिष घुमे, लिलेश ढवस, संदीप झाडे, नितीन नागरकर, विक्की तवाडे, किशोर डुकरे, शेरखान पठाण, गणेश उराडे, अक्षय बोदंगुलवार, प्रमोद देठे, मुज्जू शेख, ओंकार कांबळे, देवा पांडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Warora attack review meeting