शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींच्या औषधांसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 6, 2016 00:41 IST

गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या राज्यातील युती सरकारचे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास दिरंगाई होत आहे

ओआरएस, सलाईनची अनेक रूग्णालयात कमतरत : उपचारासाठी रूग्णांची खासगी रूग्णालयात धावअरूण सहाय  चंद्रपूरगतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या राज्यातील युती सरकारचे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध औषधांचा तुटवडा आहे. अनेक रूग्णालयात ओआरएस, सलाईन उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण रूग्णांना उपचारासाठी खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, दीड कोटी रूपयांच्या औषधांची मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केली आहे. मात्र औषधे उपलब्ध होण्यासाठी दीड महिन्यापासून प्रतीक्षाच करावी लागत आहे.दीड महिन्यापूर्वी दीड कोटी रूपयांचा औषधसाठा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र वित्त वर्ष संपले आणि औषध पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक रूग्णालयात औषधांअभावी रूग्णांना योग्य उपचार मिळत नाही. परिणामी ग्रामीण रूग्णांना नाईलाजास्तव उपचारासाठी खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. औषध साठ्याअभावी रूग्ण दगावला अशी एकही घटना जिल्ह्यात घडली नसली तरी रूग्णाच्या खिश्याला कात्री लागत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय अंतर्गत ३ उपजिल्हा रूग्णालय तथा १० ग्रामीण रूग्णालय जिल्ह्यात आहेत. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व रूग्णालयात औषधसाठ्याचा पुरवठा हा राज्यस्तरावरून आरोग्य विभागाच्या संचालकाद्वारे केला जाते. त्यानंतर स्थानिक रूग्णालयाच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त समितीद्वारे केले जाते. खरेदीसुद्धा याच समितीद्वारे केले जाते.आदेश देऊन पुरवठ्याची प्रतीक्षाजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दीड कोटी रूपयांच्या औषधांचा पुरवठा करण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी दिले होते. मागणीला आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही औषधांचा पुरवठा न केल्याने अधिकाऱ्यांना व रूग्णांना औषधांसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.अनेक रूग्णालयात ‘ओआरएस’ची कमतरता आहे. औषधांचा पुरवठा न झाल्याने ही परिस्थती उद्भवली आहे. आईवीसेट, आईवी सलाईन, कफसिरफ या औषधांची कमतरता आहे. - डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर. दीड कोटी रूपयांच्या औषध पुरवठ्याचे आदेश दीड महिन्यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र अनेक औषधांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा सलाईनवर आहे. - महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.