प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल जोडीचे व्हॉइस सॅम्पल प्रयोगशाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:24 IST2026-03-28T13:14:05+5:302026-03-28T13:24:03+5:30

Chandrapur : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा तपास आता तांत्रिक वळणावर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार या दोघांचेही व्हॉइस सॅम्पल्स पोलिसांकडून घेण्यात आले असून, ते नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Voice samples of constable couple who poisoned father to death for opposing love affair found in lab | प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल जोडीचे व्हॉइस सॅम्पल प्रयोगशाळेत

Voice samples of constable couple who poisoned father to death for opposing love affair found in lab

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा तपास आता तांत्रिक वळणावर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार या दोघांचेही व्हॉइस सॅम्पल्स पोलिसांकडून घेण्यात आले असून, ते नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पोलिसांनी आरोपींचे मोबाइल फोन आधीच जप्त केले आहेत. तीन वर्षापूर्वी रचलेला हा कट आणि त्या दरम्यान झालेली संभाषणे यांचे धागेदोरे मिळविण्यासाठी हे व्हॉइस सॅम्पलिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. प्रयोगशाळेचा अहवाल या खटल्यात मुख्य प्रगता ठरू शकतो. 

दोघांचेही खाकी सेवेचे स्वप्न अर्धवट

कॉन्स्टेबल आशिष शेडमाके नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याचे दोन-तीन वादग्रस्त प्रकरण पुढे आले. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. मात्र, आता तो पुन्हा लवकरच रुजू होणार होता. त्यातच हे प्रकरण पुढे आले, तर कॉन्स्टेबल आर्या बाल्लावार हिने २३ मार्च २०२६ रोजी पासिंग आऊट परेड पूर्ण केली होती. मात्र, दोन दिवसांनंतर हत्येचे प्रकरण पुढे आल्याने तिच्या खाकी वर्दीचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. 

शवविच्छेदन अहवाल आणि 'व्हिसेरा'वर मदार

  • मृत जयंत बाल्लावार यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय होते. याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता रासायनिक विश्लेषणाद्वारे विषबाधेची पुष्टी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
  • या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार चैतन्य उर्फ मॉटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे.
  • तिघांनाही पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती एडीपीओ प्रमोद चौगुले यांनी दिली.

Web Title : प्रेम संबंध के विरोधी पिता की हत्या, कांस्टेबल जोड़े के आवाज नमूने प्रयोगशाला में

Web Summary : प्रेम संबंध का विरोध करने वाले पिता को जहर देने के आरोपी कांस्टेबल जोड़े के आवाज के नमूने विश्लेषण के लिए नागपुर प्रयोगशाला भेजे गए। जब्त किए गए फोन और पोस्टमार्टम से महत्वपूर्ण सबूत तलाशे जा रहे हैं, जिससे साजिश का पर्दाफाश हो सकता है।

Web Title : Constable couple's voice samples sent for analysis in murder case.

Web Summary : Voice samples of constable couple accused of poisoning father, who opposed their relationship, are sent to Nagpur lab for analysis. Crucial evidence sought from seized phones and post-mortem, potentially revealing conspiracy.