शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि विरोधात गावकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: March 20, 2015 01:07 IST

कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नवीन प्रकल्पासाठी वेकोलिने गेल्या सात-आठ वर्षापूर्वी ८१ टक्के शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती.

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नवीन प्रकल्पासाठी वेकोलिने गेल्या सात-आठ वर्षापूर्वी ८१ टक्के शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. मात्र इतक्या वर्षानंतरही उर्वरित १७ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न झाल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. उर्वरित जमीन त्वरित संपादित करावी यासाठी विरूर ग्रामवासीयांनी गुरूवारी अघोषित आंदोलन केले. सुमारे ३०० नागरिकांनी तब्बल दहा तास ग्रामपंचायतीसमोर धरणे दिले. त्यात महिलांची संख्या अधिक हातेी. मात्र सरपंचासह इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठ दाखविल्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.संपादित झालेल्या जमीन मालकाला मोबदला म्हणून वेकोलिकडून विशिष्ट रक्कम व नोकरी देण्यात येणार आहे. वेकोलिच्या कामाला प्रारंभ होताच, गावाचे पुनर्वसन होणार आहे. ८१ टक्के ग्रामस्थ गाव सोडून गेल्यानंतर १७ टक्के ग्रामस्थांना तेथे राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे दानोदा, विरूर, गाडेगाव व खैरगाव या शिवेतील उर्वरित जमीन वेकोलि संपादित करणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जमिनी संपादित करून आम्हाला मुक्त करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.येत्या २२ मार्चला विरूर (गाडेगाव) येथील वेकोलिचे भूमिपूजन होणार असून वेकोलिकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमाला मंत्री व प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र भूमिपूजन करण्याअगोदर उर्वरित १७ टक्के जमिनीचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी निवेदन घेऊन ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये गेले. मात्र निवेदन घेण्याकरिता सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले. प्रशासनानेही या प्रश्नाला बगल दिली. (शहर प्रतिनिधी)