शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

ग्रामस्थांनी बंद पाडले चखविरखल शाळा बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

सावली पंचायत समिती अंतर्गत चकविरखल येथे १२ लाख ४७ हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामात अनियमितता होत असल्याचे कंत्राटदार के. आर. पुल्लुरवार आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देनिकृष्ट बांधकाम : ग्रामस्थांची तक्रार, कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील चकविरखल येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्गखोलीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रारी केली. त्याची दखल घेत पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी बांधकामाची पाहणी करून काम बंद पाडले.सावली पंचायत समिती अंतर्गत चकविरखल येथे १२ लाख ४७ हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामात अनियमितता होत असल्याचे कंत्राटदार के. आर. पुल्लुरवार आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्याकडे तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेत त्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने त्यांनी काम बंद पाडले. त्यानंतर संबंधित अभियंत्यांना झालेल्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले.जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्यांनी कामावर लक्ष न दिल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारणार तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.संबंधित अभियंता व कंत्राटदाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी तसेच कामाची चौकशी करावी, अशी मागणी सभापती कोरेवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आपल्याकडे केली होती. त्यानुसार आपण घटनास्थळावर जावून चौकशी केली. निष्कृष्ट बांधकाम होत असल्यामुळे बांधकाम बंद पाडले. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.- विजय कोरेवार,सभापतीपंचायत समिती, सावलीशाळा वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे काँक्रीट तोडून नव्याने काम करून देण्यात येणार आहे.- के.आर. पुल्लुरवारकंत्राटदार