शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातला वनपाल डी.लिट. पदवीने सन्मानीत होतो तेव्हा..!

By admin | Updated: June 11, 2014 23:52 IST

मनात इच्छाशक्ती, हिंमत आणि काहीतरी करायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर असले की, चांगली लक्षवेधी आणि इतरांना प्रेरक ठरावी अशी प्रगती करू शकतो. वन विभागात कार्यरत कर्मचारी विविध पदव्या मिळवू शकतो.

बाबुराव परसावार- सिंदेवाहीसिंदेवाही : मनात इच्छाशक्ती, हिंमत आणि काहीतरी करायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर असले की, चांगली लक्षवेधी आणि इतरांना प्रेरक ठरावी अशी प्रगती करू शकतो. वन विभागात कार्यरत कर्मचारी विविध पदव्या मिळवू शकतो. याची कल्पनाच करू शकत नाही. मात्र येथील वन विभागात कार्यरत वनपाल नामदेव कापसे यांनी विविध पदव्या प्राप्त केल्या. एवढेच नाही तर ते जनप्रबोधनाचे प्रभावीपणे कार्य करीत आहेत. ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची आवड असल्यामुळे शालेय जीवनात त्यांनी लिहिलेल्या कविता व लेख वर्तमानपत्रात प्रकाशीत झाले. ‘अध्यात्म’ या विचारावरील कात्रणाचे पाच खंड त्यांनी संग्रहीत केले आहे. कापसे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त गावोगावी जावून प्रबोधनात्मक मार्गदर्शन करीत आहेत.राष्ट्रसंताच्या साहित्याचे संकलन, लेखन, चिंतन यामुळे ते राष्ट्रसंताच्या विचाराचे वाहक बनले. शासकीय काम नियमीत करून सामाजिक व प्रबोधनाचे कार्यही कापसे हे मोठ्या कौशल्याने करीत आहेत. त्यांना आतापर्यंत साहस पुरस्कार, वन्य प्राणी संरक्षणाबाबत प्रशस्तीपत्र, श्री गुरुदेव ग्रामगीता विश्व विद्यापीठ अड्याळ टेकडी यांच्याकडून सन्मानपत्र, वन विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनमंत्र्याकडून २५ हजार रुपये पुरस्कार व प्रशस्तीपत्र, छत्रपती शिवाजी आदर्श समाज सेवक सन्मान रूरल नैचरोपैथी आर्गनायझेशन औरंगाबादतर्फे (डी.एम.एच.) डॉक्टर पदवीने सन्मानीत, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडून महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून कापसे हे समाज प्रबोधनाचे कार्य गेल्या २० वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आनलाईन विद्यापीठाने डि.लिट. पदवीने सातारा येथे २३ मार्च २०१४ सन्मानीत केले. इंटरनॅशनल ह्युमन राईटस जस्टीस फेडरेशनद्वारा ३४ वा आंतरराष्ट्रीय दिक्षांत समारोहात विद्यापीठाचे कुलगुरू दिनबंधू, डॉ. मधुसुदन घाणेकर, संशोधक डॉ. सुधीर तारे, डॉ. विठ्ठल मदने यांच्याहस्ते कापसे यांना डी.लिट. पदवी बहाल करण्यात आली. आत्मविश्वास दृढ निश्चय, समाज कार्य करण्याची तळमळ यातूनच मी घडलो आहे, असे त्यांचे मत आहे.