शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गाव एका गल्लीचे, कारभार दोन ग्रामपंचायतींमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून जुळलेले गाव म्हणजे खुर्सापार असा येथील इतिहास आहे.

ठळक मुद्देविकास मात्र खुंटला : खुर्सापार गावाची अजब कहाणी, गावकरी म्हणतात, एकच ग्रामपंचायत हवी

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : दोन किंवा त्यापेक्षा अधिक गावे, वाड्या-वस्त्यांंची मिळून गटग्रामपंचायत असते. त्यामार्फत कारभार चालतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. पण केवळ एकच गल्ली असलेल्या गावचा कारभार चक्क दोन ग्रामपंचायतींमधून चालतो, हे मात्र दुर्मिळच. चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशीच काही अवस्था खुसार्पारची झाली आहे.चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून जुळलेले गाव म्हणजे खुर्सापार असा येथील इतिहास आहे.गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास असून शंभरावर मतदार आहेत. वाहानगाव व बोथलीपासून जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता आहे; मात्र पाणी, दिवाबत्ती, गटारी अशा सुविधांची वानवा आहे. दोन ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या गावाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ मात्र एकच आहे. ग्रामपंचायत दोन असल्यामुळे दोन्ही बाजूंनी निधी आणून विकासकामे राबवणे सोपे आहे, असेच सर्वांना वाटले; पण प्रत्यक्षात सीमा वाद आडवा येतो. शिवाय येथे मतदारसंख्याही जुजबीच आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती विकासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अंतर्गत विकास खुंटला आहे.एकाच गावात शाळेच्या दोन इमारतीवाहानगाव व बोथली अशा दोन ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या खुर्सापार गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. शाळेसाठी बोथली ग्रामपंचायत व वाहानगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने दोन इमारती बांधल्या आहेत. त्यामध्ये बोथली ग्रामपंचायतने बांधलेली शाळा जीर्ण झाली. त्यामुळे आता वाहानगाव ग्रामपंचायतने बांधलेल्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.इतर सुविधांसाठी पायपीटशिक्षणासाठी काही विद्यार्थी परगावी गेले आहेत. गावात प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी मात्र विद्यार्थांना सुमारे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. दळणवळणाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची कामानिमित्त दररोज पायपीट ठरलेलीच. गावात प्राथमिक सुविधाही नाहीत.तीन घरांपासून आता ४० घरे झाली आहेत. गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास. मात्र गावाचा कारभार दोन ग्रामपंचायतींमधून चालतो. त्यामुळे विकास कामे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गावाचा समावेश दोनपैकी कोणत्याही एकाच ग्रामपंचायतमध्ये करावा.- बंडू बुचे,ग्रामस्थ, खुर्सापार.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत