शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवारांची माघार, धानोरकरांसह १३ संचालक अविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:04 IST

जिल्हा बँक निवडणूक : आता २३ उमेदवारांमध्ये सात जागांसाठी निवडणूक, गोंडपिपरीत उमेदवारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदाच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह तब्बल १३ संचालक अविरोध निवडून आले. आमदार विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह ११३ उमेदवारांनी शुक्रवारी (दि. २७) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. आता केवळ सात संचालकांसाठी २३ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे अ गटातून सहकारी क्षेत्रातील सर्वाधिक १० दिग्गज उमेदवारांनी आपली पकड कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी २१३ नामांकन दाखल झाले होते. छाननीनंतर १५५ नामांकन पात्र ठरले होते. पैकी सहा जण न्यायालयातून अपात्र ठरले. ११३ जणांनी माघार घेतल्याने निवडूणक रिंगणात २३ उमेदवार उरले आहे. बँकेच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच एक खासदार, दोन आमदार व एका माजी आमदाराने नामांकन दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषयाचा झाला. दरम्यान, सात उमेदवारांच्या नामांकनाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात तसेच विभागीय उपनिबंधकांकडे धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सात उमेदवारांचे नामांकन पात्र ठरविले. शुक्रवारी (दि. २७) नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही अ गटातून आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी गट ब २ तसेच अनुसूचित जाती गटातून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. गोंडपिपरीत उल्हास करपे व अमर बोडलावार यांचे नामांकन रद्द झाले. या गटात उमेदवारच रिंगणात नाही. 

अविरोध ठरलेले संचालकखासदार प्रतिभा धानोरकर, माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, रविंद्र शिंदे, संदीप गड्डमवार, संजय डोंगरे, डॉ. अनिल वाढई, गणेश तर्वेकर, आवेश पठाण, नागेश्वर ठेंगणे, विलास मोगरकर, नंदा अल्लूरवार, शेखर धोटे, दामोदर मिसार आदी एकूण १३ उमेदवार संचालकपदी अविरोध ठरले आहेत. आता वरोरा, चंद्रपूर व सिंदेवाही येथे अट गट, ओबीसी, एससी-एसटी, एनटी व ब २ गट या सात जागांसाठी निवडणूक होईल.

भाजपचा सहा संचालकांवर दावा, रावत गटाचा नऊ सदस्यांवर दावाजिल्हा बँकेच्या निवडणुकीत १३ जण अविरोध निवडून आले. यामध्ये सहाजण भाजपचे असल्याचा दावा चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 'लोकमत'जवळ केला. मात्र त्यांनी नावे देण्यास असमर्थता दर्शविली. उमेदवारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. जिल्हा बँकेत आघाडीबाबत बरीच राजकीय खलबते झाली. यामध्ये नेमके काय घडले, यावर कुणीही भाष्य केले नाही. या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार सुभाष धोटे, संतोषसिंह रावत यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते. यावेळी आघाडीवरून चांगलीच रस्सीखेच झाल्याची माहिती आहे. नऊ जागांवर आपले संचालक अविरोध निवडून आल्याचा दावा रावत गटाकडून करीत आहे.

११ जुलैला होणार मतदानउमेदवारांची अंतिम यादी ३० जून रोजी जाहीर होईल. १० जुलैला मतदान व ११ जुलैला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

विलास मोगरकारांच्या संघर्षाचा शानदार विजयजिल्हा मध्यवर्ती बँकेत पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द या छोटाशा गावचे विलास मोगरकार हे अविरोध निवडून आले. सहकारी संस्थांच्या निवडणुकीपासून ते अविरोध निवडीपर्यंत त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. मात्र त्यांनी कायदेशीर मार्ग पत्करून विरोधकांचे मुनसुबे धुळीस मिळविले. त्यांच्या विरोधकांनी त्यांना तेलंगणामध्ये घेरले होते. तेथील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी संचालक पदाच्या निवडणुकीची पहिली परीक्षा उत्तीर्ण केली. संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेचा चुकीचा अर्थ काढून त्यांच्या विरोधात दंड थोपटले. मात्र मोगरकारांनी हतबल न होता न्यायालयाचे दार ठोठावले. परिणामी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने मोगरकार यांचा अविरोध विजयाचा मार्ग सुकर होऊन अखेर संघर्षाचा शेवट विजयात झाला.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर