शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यांना अटक

By admin | Updated: June 5, 2015 01:09 IST

शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जात होते. मात्र चोरट्यांचा थांगपता लागत नव्हता. पोलिस प्रशासनाने वाहन चोर पकडण्यासाठी पथक नेमले.

ब्रह्मपुरी: शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जात होते. मात्र चोरट्यांचा थांगपता लागत नव्हता. पोलिस प्रशासनाने वाहन चोर पकडण्यासाठी पथक नेमले. दरम्यान, दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी केली.अटकेतील आरोपींची नावे सुभाष डोंगरवार व किशोर जांभुळकर असे असून दोघेही गोंदिया जिल्ह्यातील धाबेटेकडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी पोलिसात गुन्ह्याची कबुली दिली आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. यामुळे वाहन चालक चांगलेच धास्तावले होते. याची तक्रार पोलिसात करण्यात आली. मात्र वाहन चोरांचा सुगावा लागत नव्हता.अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात चोरांना जेरबंद करण्यासाठी पथक नेमण्यात आले. पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, पोलीस कर्मचारी गोवर्धन पानसे, शेडमाके, दुधे यांच्या पथकाने गोंदिया जिल्ह्यातील सुभाष डोंगरवारला पहिल्यांदा चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रारंभी त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र पोलिसी हिसका दाखविताच त्याने साथीदार किशोर जांभुळकर सोबत दुचाकी वाहनाची चोरी केल्याचे मान्य केले. आरोपीकडून हिरो पॅशन प्रो, पॅनश प्लस, सीडी डिलक्स अशी चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या असून आणखी चार-पाच वाहने जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (तालुका प्रतिनिधी)