शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिला कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: February 5, 2015 23:06 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएचपीचे काम सुरू झाले आणि सुरू झालेले काम मधेच बंद करण्यात आले आहे.

बी.यू. बोर्डेवार - राजुरावेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएचपीचे काम सुरू झाले आणि सुरू झालेले काम मधेच बंद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे वेकोलिला कोट्यवधीचा फटका बसला आहे.सास्ती कोळसा खाणीत नवीन सीएचपीच्या कामाचा शुभारंभ १९९८ मध्ये मोठ्या थाटात करण्यात आला होता. या कामावर चार ते पाच कोटी रुपये खर्चुन नवीन यंत्रसामग्री, सीएचपी स्ट्रम्पर तयार करण्यात आले. मात्र पाणी कुठे मुरले कुणास ठाऊक. अचानक काम मधेच बंद करण्यात आले. या सीएचपीसाठी आणलेली कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री काही काळ धूळखात होती. परंतु आता २०१५ मध्ये येथील साहित्याची चोर, माफीयामार्फत भंगारात विक्री होत आहे. या स्थळाची पाहणी केली असता कोट्यवधींचे संयंत्र भंगारात गेल्याचे दिसून आले. परंतु वेकोलिच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सीएचपीचे काम बंद पाडणाऱ्या वेकोलिच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सास्ती येथील नवीन सीएचपीचे काम पूर्ण झाले असते तर जवळपास एक लाख टन कोळशाचा साठा करून ठेवण्याची सोय झाली असती. सोबतच रेल्वे रॅकची लोडींग झाली असती. शिवाय कोळसा चोरी करणाऱ्यांवर प्रतिबंध घालता आला असता. आता रेल्वे रॅक लोडींगकरिता ट्रकमालकाना पैसे मोजावे लागत आहे. या सर्व बाबी वेकोलिच्या फायद्याच्या ठरणाऱ्या होत्या. मात्र सीएचपीचे काम बंद केल्यामुळे वेकोलिला हे काम अपूर्ण अवस्थेत बंद करण्यात आले. येथील लोखंडी अँगल, साहित्य गाड्यामध्ये भरून मागील वर्षात भंगार चोरट्यांनी विकून टाकल्याची माहिती आहे. तरीही वेकोलिची सुरक्षा यंत्रणा जागी झाली नाही. नुकतेच वेकोलिच्याच सुरक्षा वाहनातून वेकोलि साहित्य चोरून नेताना पकडण्यात आले होते, हे विशेष. वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक यांचा वचक नसल्यामुळे वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची विजीलन्सतर्फे चौकशी करण्याची मागणी होत आहे.