शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात एक लाख ८५ हजार ७६१ बालकांना देणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:40 IST

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देश संपूर्ण पोलिओमुक्त करण्यासाठी शासनाचे धोरण तयार केले. पुढील काही वर्षात देशात एकही पोलिओओग्रस्त बालक आढळणार नाही, या हेतूने जिल्ह्यात १० मार्च रोजी ८५ हजार ७६१ बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज : रविवारी पल्स पोलिओ अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देश संपूर्ण पोलिओमुक्त करण्यासाठी शासनाचे धोरण तयार केले. पुढील काही वर्षात देशात एकही पोलिओओग्रस्त बालक आढळणार नाही, या हेतूने जिल्ह्यात १० मार्च रोजी ८५ हजार ७६१ बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.पोलिओ रोगाचे निर्मुलन करण्याचे हेतुने केंद्र सरकारकडून १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नियमित लसीकरण, एएफपी सर्वेक्षण व पोलिओग्रस्त आढळल्यास मॉप अप रॉऊंडद्वारे उपचार केले जाते. देशात जानेवारी २०११ नंतर अद्याप पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही.पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून प्रथमच एवढे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला.जानेवारी २०१४ मध्ये देशाला पोलिओ निर्मूलन प्रमाणपत्र मिळाले. १० मार्च रोजी शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना ही लस पाजण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आढावा सभेत दिली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कार्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.दोन हजार २८३ लसीकरण केंद्रपल्स पोलिओ लसीकरणासाठी ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार २८३ लसीकरण केंद्रे स्थापन तयार करण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशी स्थलांतरीत बालकांनाही लस देता यावे, याकरिता जिल्ह्यात ९६ फिरते पथक ग्रामीण भागात व शहरी भागात १३ व महानगर पालिका क्षेत्रात १८ अशा एकूण १२७ पथकांची व्यवस्था प्रशासनाने. टोलनाका, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रा व मोठ्या चौकांमध्ये ट्राझिंट पथकाद्वारे लसीकरणाची व्यवस्था केली आहे.आरोग्य कर्मचारी नियुक्तग्रमीण विभाग चार हजार ५९३, शहरी विभाग ४६० व महानगरपालिका ३८८ असे एकून पाच हजार ३४१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. ग्रामीण ४०५ व शहरी विभाग ३४ व महानगर क्षेत्र २७ असे एकून ४६६ पर्यवेक्षकांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे.