शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

१४ आदर्श गाव प्रकल्पात उखर्डा गाव

By admin | Updated: December 21, 2015 01:13 IST

राज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.

स्वच्छता अभियानात नावलौकिक : मूल तालुक्यातील राजगडचाही समावेशप्रविण खिरटकर वरोराराज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड व वरोरा तालुक्यातील उखर्डा गावांचा समावेश आहे.वरोरा तालुक्यातील ६०० लोकसंख्या असलेल्या उखर्डा गावात १३० कुटुंबे आहेत. १२९४ हेक्टर शेत जमीन आहे. त्यातील अकराशे हेक्टर जमिनीवर नागरिक पिके घेत आहेत. उखर्डा गावात सन २००० पासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.त्यात संपूर्ण गाव सहभागी होत असते. ग्रामस्थांनी श्रमदानातून अनेक कामे केली आहेत. शासकीय जमिनी श्रमदानातून स्वच्छ करीत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन केल्याने झाडे आता डोलाने उभे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा आदर्श ठेवीत असे एक ना अनेक कामे श्रमदानातून ग्रामस्थांनी केली आहेत. सप्तसूत्रीेचे पालन, पानलोट विकास कामे, एक गाव एक गणपती, एकच दुर्गा देवी असे अनेक उपक्रम उखर्डा ग्रामस्थांनी राबविल्याने उखर्डा गावाला शासनाचा तालुका स्तरावरील दोनदा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे.आता उखर्डा गावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळून गावातील कामे पूर्णत्वास येणार आहे.गावाचा एकोपा अचानक सहा वर्ष थांबलासन २००० पासून उखर्डा गावात एकोप्याने सर्व काही सुरु असताना सन २००६ मध्ये निवडणूका आल्याने गाव दुभंगले व एकोपा तुटला. अनेकांची मने दुखावली. त्यामुळे उखर्डा गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची लोकचळवळ उभारणारे निवृत्त शिक्षक भाऊराव वैद्य कमालीचे अस्वस्थ होवून गेले. त्यांना काही कळेनासे झाले. परंतु विचार विकास सामाजिक संस्था वरोराचे किशोर चौधरी यांनी भाऊराव वैद्य यांना उखर्डा गावात उपक्रम सुरु करण्याबाबत विनवनी केली. परंतु एवढे दुंभगलेले गाव एकत्र आणणार कसे असे म्हणत प्रारंभी भाऊराव वैद्य यांनी नकार दिला. किशोर चौधरी यांनी आपला हेका सोडला नाही. त्यामुळे भाऊराव वैद्य यांनी होकार देवून किशोर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यासह उखर्डा गावात जावून भेट दिली. नागरिकांची मने जिंकत परत सहा वर्ष थांबलेले ग्रामस्वच्छता अभियान २०१२ पासून सुरु झाले. ते आजही अविरतपणे सुरु आहे. पोपटराव पवारांची उखर्डा गावास भेट १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उखर्डा गावात भेट देवून पानलोट विकास कामे, श्रमदानाची, स्वच्छतेची पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे अतिरिक्त कृषी मुख्य सचिव डी.के. जैन, अपर सचिव कराड, उपसंचालक जगताप, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे आदी उपस्थित होते.