शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा

By admin | Updated: March 18, 2015 01:15 IST

शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन ...

बल्लारपूर: शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी किन्ही येथे रविवारी आयोजित कृषी मेळाव्यात केले.बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा किन्ही येथील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला बोबाटे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती सुमन लोहे, किन्ही येथील सरपंच वासुदेव येरगुडे, उपसरपंच जीवनकला आलाम, कृषी मंडळ अधिकारी मारोतराव वरभे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी, गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजने, विस्तार अधिकारी मोल उघडे, सुधाकर खांडरे, आमडचे दादाजी वांढरे, ग्रामसेवक एकनाथ चाफले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, आजघडीला शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. परिणामी खरीप व रबी हंगामावर अवकळा ओढवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस यात भर टाकत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. बी.गजभे, एम. पी. वरभे, वासुदेव येरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. संचालन देवेंद्र डुंबरे यांनी तर आभार अमोल उघडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणातत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)