शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या विकासासाठी पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक!

By admin | Updated: January 4, 2017 00:58 IST

बिबी ग्राम आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. सक्षम नेतृत्वच गावाचा विकास करू शकते.

सुभाष धोटे : बिबी येथे शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएमचे लोकार्पण कोरपना : बिबी ग्राम आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. सक्षम नेतृत्वच गावाचा विकास करू शकते. गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच व इतर पुढाऱ्ययांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी केले. ग्रामपंचायत बिबीच्या पेसा निधी अंतर्गत व अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने बिबी येथे शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएमची सुविधा तसेच अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने बिबी येथील रामनगर कॉलनीत सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी पार पडला. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड जी. बाला सुब्रमण्यम यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे विविध विभागाचे कार्यकारी प्रमुख अनिल पिल्लई, लोहिया, तिवारी, सी. एस. आर. चे उपमहाव्यवस्थापक आशिष पासबोला, एल. अ‍ॅड टी. सिमेंट कामगार संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे, जि.प. सदस्या सरोज मुनोत, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेठकर, साईनाथ बतकमवार, आनंदराव पावडे, सरपंच मंगलदास गेडाम, माजी सरपंच इंदिरा कोडापे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, माजी अध्यक्ष नामदेव ढवस, रामदास देरकर, कवडू पिंपळकर, ग्रा.पं. सदस्य नरेंद्र अल्ली, सुधा मोरे, संगीता ठाकरे, निवृत्ती ढवस व इतर मान्यवर उपस्थित होते. शुद्ध व थंड पाण्याच्या ए.टी.एम.चे प्रथम ग्राहक पुरुषोत्तम काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास मांदाडे, नीतेश मालेकर, सुनील कुरसंगे, अनिल आत्राम, संतोष झुरमुरे, आकाश कोडापे, सुनील जांभूळकर, लोकेश कोडापे, सुनील रासेकर, संजय मडकाम, दयाल आत्राम, चरणदास कोडापे, प्रेमराज झुरमुरे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)