शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधील रकमेच्या चोरी प्रकरणी दोन महिला अटकेत

By admin | Updated: March 14, 2015 01:04 IST

येथील पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रात कार्यरत महिला सहाय्यीका यांच्या बॅगमधील तीन एटीएम कार्ड लंपास करून त्याद्वारे विविध एटीएम केंद्रातून...

भद्रावती : येथील पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रात कार्यरत महिला सहाय्यीका यांच्या बॅगमधील तीन एटीएम कार्ड लंपास करून त्याद्वारे विविध एटीएम केंद्रातून ६९ हजार २०० रुपये काढण्यात आले. या प्रकरणातील तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. ही घटना बुधवारी घडली.आकाश दिनेश मिश्रा (१७) रा. वरोरा, उमेश ऊर्फ हनुमान सिमनानी (३०) रा. अमरावती व पूजा ऊर्फ बिट्टी दिनेश मिश्रा (२०) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एटीएम कार्डची चोरी पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रातून झाली. बुधवारला येथील आठवडी बाजार असते. आठवडी बाजाराच्या दिवशी अनेक सराईत गुन्हेगार याठिकाणी हजेरी लावतात. समुपदेशक केंद्रातील महिला सहाय्यीका दीपकांता लभाने या बॅग तिथेच ठेवून काही कारणास्तव बाहेर गेल्या. हिच संधी साधून आरोपी आकाश दिनेश मिश्रा याने बॅगेतील तीन एटीएम कार्ड चोरले. यावेळी त्याचे सहकारी उमेश सिमनानी, पूजा मिश्रा हे सुद्धा उपस्थित होते. चोरी केल्यानंतर या सर्वांनी स्टेट बँक आॅफ इंडिया वरोरा येथून २५ हजार, सेंट्रल बँक वरोरा येथून १६ हजार ६१०, बँक आॅफ इंडिया भद्रावती ४ हजार ५०० व नागपूर येथील वेगवेगळ्या ठिकाणावरून असे एकूण ६९ हजार २०० रुपये काढलेत. यात सिडीको बँक चंद्रपूर, बँक आॅफ इंडिया वरोरा आणि स्टेट बँक आॅफ वरोरा या बँकांचे एटीएम होते. या एटीएमचे पासवर्ड त्यावरतीच लिहून होते. हे सर्व आरोपी येथे एका मित्राच्या कार्यक्रमासाठी आले होते. घटनेची दखल घेऊन ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक क्षिरसागर यांनी विविध एटीएम मधून त्याचे फुटेज काढले आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपी हनुमान सिमनानी हा फरार आहे. आरोपीना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (शहर प्रतिनिधी)