शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात दोनजण जखमी

By admin | Updated: June 19, 2016 23:11 IST

संगमनेर/बोटा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना पिंप्री लौकी आजमपूर येथे रविवारी घडली. या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.

संगमनेर/बोटा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना पिंप्री लौकी आजमपूर येथे रविवारी घडली. या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे. दुसरी घटना रविवारी दुपारी एक वाजता केळेवाडी शिवारातील उघडे वस्तीवर घडली.रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिंप्री लौकी आजमपूर येथील शेतमजूर धोंडीबा जीवबा ढोणे(वय ४०) हे याच परिसरातील नानासाहेब कुंडलीक मुंढे यांच्या पानोडी रोडवरील शेतामध्ये ऊस काढण्यासाठी गेले होते. दरम्यान ऊस काढत असताना शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे ढोणे यांच्या अंगावर झडप घातली. बिबट्याला पाहून ढोणे यांनी आरडाओरड केली.मात्र तोपर्यंत बिबट्याने ढोणे यांच्या हाताला कडाडून चावा घेतला. बिबट्याच्या तावडीतून स्वत:ला सोडविण्याच्या प्रयत्नात ढोणे यांच्या मांडीत दात घुसून खोलवर जखमा झाल्या.आवाज ऐकून घटनास्थळी पळत आलेल्या नानासाहेब मुंढे यांनी दगड उचलून बिबट्याच्या पाठीत मारला. त्यामुळे बिबट्याने ढोणे यांना सोडून धूम ठोकली. दुसऱ्या घटनेत केळेवाडी शिवारातील उघडे वस्तीवर डाळिंब बागेलगतच्या रस्त्याने होनाजी सयाजी उघडे(वय २२) हा तरूण जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हे पाहून बागेत काम करणाऱ्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याने होनाजी उघडे याच्या हात, पाठ व छातीला पंजाने ओरबडल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेतील उघडे यास उपचारासाठी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र हाताच्या खोलवर जखमेमुळे रक्तस्त्राव झाल्याने मंचर येथील (जि. पुणे) जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच वनरक्षक झाकीर राजे व तान्हाजी फापाळे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)