शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात १० कोरोना रूग्ण ब्रह्मपुरी तीन दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेला परिसर सील केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : हॉस्पिटल, मेडिकल, शासकीय कार्यालय सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : २५ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ब्रह्मपुरी शहरात दोन दिवसात कोरोनाचे १० रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १ जुलैपासून तीन दिवसांसाठी शहर बंद ठेवण्यात येणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेला परिसर सील केला आहे.आरोग्य तपासणीप्रशासनाने सोमवारी सायंकाळी रेणुका माता चौक, फाशी चौक, भवानी वार्ड, चांदगाव मार्ग सील केला केला आहे. १ ते ३ जुलैपर्यंत शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात आरोग्य तपासणी सुरू राहणार आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नये व कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गांगलवाडी येथेही सहा बाधित आढळल्याने गाव सील करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली.