चंद्रपूर जिल्ह्यात दोन चिमुकल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 10:11 IST2019-03-25T10:10:36+5:302019-03-25T10:11:12+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील दोन चिमुकल्या भावंडाचा मुरुमासाठी खोदलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Two brothers drown in Chandrapur district in the lake | चंद्रपूर जिल्ह्यात दोन चिमुकल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात दोन चिमुकल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

ठळक मुद्देमासेमारीच्या मच्छरदाणी अडकल्याने गमावले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील दोन चिमुकल्या भावंडाचा मुरुमासाठी खोदलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. स्पंदन जोतिबा मेश्राम (७) व आयुष जोतिबा मेश्राम (४) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही रविवारी दुपारी चार वाजता आईसोबत गवरला शिवारात असलेल्या शेतात गेले होते. आई शेतात काम करीत असताना दोघेही भाऊ लगतच असलेल्या तलावावर गेले. तलावात आधीच कुणीतरी मासोळ्या पकडण्यासाठी मच्छरदाणी टाकून ठेवली होती. हे भाऊ त्या मच्छरदाणीत अडकून जागीच मरण पावले. तिकडे त्यांच्या आईने दोन्ही मुले जवळपास दिसत नसल्याने ती घरी गेली असावीत असे समजून तीही घरी गेली. मात्र घरीही न दिसल्याने तिच्या काळजाचे ठोके वाढले. शोध घेत तलाव गाठले असता दोघांचेही मृतदेह जाळ््यात अडकलेले आढळून आले. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two brothers drown in Chandrapur district in the lake