शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जमीन हस्तांतरण समितीने घेतली जनसुनावणी

By admin | Updated: March 12, 2015 00:40 IST

राजुरा विधानसभा क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात मोडत असल्याने राज्यापालद्वारा गठीत विदर्भ विकास मंडळाच्या आदिवासी जमीन हस्तांतरण अभ्यास समितीची जनसुनावणी मंगळवारी राजुरा येथे पार पडली.

राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात मोडत असल्याने राज्यापालद्वारा गठीत विदर्भ विकास मंडळाच्या आदिवासी जमीन हस्तांतरण अभ्यास समितीची जनसुनावणी मंगळवारी राजुरा येथे पार पडली. येथील सूपर मार्केट सभागृहामध्ये समितीचे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅड. पोर्णीमा उपाध्याय, दिलीप गोडे, महादेव चिलोट यांच्या उपस्थित ही बैठक झाली. यावेळी तहसील कार्यालयाचे अधिकारी, तलाठी उपस्थित होते. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये १०० करोडच्यावर आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासीनी हडपल्या असून याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या राधाबाई आत्राम यांनी यावेळी केली. आलेल्या सर्व आदिवासी प्रकरणांचा सविस्तर अहवाल तलाठ्यानी आठ दिवसात देण्याचे फर्मान समितीने यावेळी सोडले. याप्रसंगी भाजपाचे नेते वाघू गेडाम आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी या भागातील कोलामाला न्याय मिळवून देण्याची मागणी समितीपुढे केली. मूर्ती येथील कोलामांना त्वरीत पट्टे मिळवून देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने सास्ती येथील बंडू कुळमेथे व इतर याची सात एकर जमीन नियमबाह्य हडपून यावर एरिया दवाखाना उभा केला. त्याना मोबदला दिला नाही आणि नोकरी सुद्धा दिली नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन राजुरा तालुका प्रेस असोसिएशनचे उपाध्यक्ष सादीक काझी, हृ्युमन राईट काऊन्सील आॅफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी या अभ्यास कमेटीकडे केली. वेकोलिच्या धोरणांमुळे करोड रूपयांचे मालक असणारे आदिवासी बांधव आज धुणीभांडी करून पोट भरत आहेत. त्यांना गेल्या १८ वर्षापासून न्याय मिळालेला नाही. आता समितीच्या निर्णयावर त्यांचे लक्ष लागून आहे. (शहर प्रतिनिधी)