मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, 12 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 09:53 IST2023-01-28T09:53:06+5:302023-01-28T09:53:22+5:30

दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.

Travels carrying laborers overturned; One killed, 12 injured | मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, 12 जण जखमी

मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, 12 जण जखमी

चंद्रपूर : छत्तीसगड राज्यातून बेमेत्रा जिल्ह्यातील ता. नावागळ येथून हैदराबादला 37 मजूर घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स आज पहाटे 2.30 वाजता राजुरा तालुक्यातील वरूर ते धानोरा मार्गावर पलटी झाली. या अपघातात 1 ठार ते 12 जण गंभीर जखमी झाले. अन्य मजूर किरकोळ जखमी झाले. जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.

Web Title: Travels carrying laborers overturned; One killed, 12 injured

टॅग्स :Accidentअपघात