शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सागवानाची तस्करी करणारे जाळ्यात

By admin | Updated: November 6, 2014 22:51 IST

मानिकगड पहाडावरील जिवती वन परिक्षेत्रास लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील डोंगरगाव (चिचपल्ली बिट) येथे सागवन झाडाची तोड करुन त्याची वाहतूक महाराष्ट्र वन विभागाच्या कोलांडी, नंदप्पा मार्गे

नऊ जणांना अटक : अपघातामुळे उघडकीस आली तस्करीराजुरा : मानिकगड पहाडावरील जिवती वन परिक्षेत्रास लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील डोंगरगाव (चिचपल्ली बिट) येथे सागवन झाडाची तोड करुन त्याची वाहतूक महाराष्ट्र वन विभागाच्या कोलांडी, नंदप्पा मार्गे कागजनगरला मेटॅडोरद्वारा करीत असताना अचानक कोलांडी जवळील वळणावर मेटॅडोरला उलटला. या अपघातामुळे सागवानाची तस्करी उजेडात आली. मेटॅडोरमधून सागवानाची लाकडे बाहेर आल्याने वनविभागाने तात्काळ कारवाई करीत सागवान तस्करांना ताब्यात घेतले.वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (आं.ध्र.) हे गाव आंध्र प्रदेश वन विभागाच्या आसिफाबाद रेंज, वाकडी उपपरिक्षेत्र व चिचपल्ली नियत बिटात येते. तेथील मुख्य तस्कर बाबू इंगडे हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी भिमराव जयतू मडावी रा. डोंगरगाव याची वन कोठडी घेण्यात आली आहे. वाहन मालक विठ्ठल किसन आडे व चालक बाबाराव दगडू पवार रा.जिवती याने आपल्या मेटॅडोरमध्ये (क्र. एमएच-३१ एपी- १९८२) सागवान लाकूड भरण्यासाठी डोंगरगाव येथे नेले. तेथे अगोदर कटाई करुन ठेवलेले ५१ साग नग मेटॅडोरमध्ये डोंगरगाव येथील सोनेराव महादू कुमराम, भिमराव जमतू मडावी, जयतू मारु टेकाम, मोतीराम जयतू मडावी, पोलीगा रामू आत्राम, भिमराव आनंदा आत्राम व संतोष रामा थोरात यांनी १७ आॅक्टोबर २०१४ ला भरुन दिले. माल भरलेले वाहन कागजनगरकडे जाण्यासाठी महाराष्ट्राच्या कोलांडी, नंदप्पा, भारी मार्ग निघाले असताना अचानक कोलांडी नंदप्पा वन कक्ष क्र. १०४ दरम्यानच्या वळणावर मेटॅडोर उलटला. त्यामुळेच सागवान तस्करीचा प्रकार उघडकीस आला.मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक आर. एस. धोतरे यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले. जिवती वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी डी.आर. अडकीने, क्षेत्र सहाय्यक पी.एच. भसारकर, विरुर वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी अशोक मेडपल्लीवार, वनरक्षक देरकर, कराडे, अलोणे, एन. आर. देशकर, क्षे.प्र. सहाय्यक पी.एम. सुरजागडे, डी.एम. रामटेके, वन बन्दुकधारी सिद्धार्थ कांबडे, एन. ए. नरगेवार, आय.एम. शेख यांनी फरार असलेले वाहन चालक व मालकास अटक केली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला डोंगरगाव येथे जाऊन धाड टाकून झाडे तोडणाऱ्या व भरणाऱ्या अशा सात लोकांना अटक केली. मुख्य सूत्रधार बाबू इंगडे फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी भिमराव मडावी याला वनकोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासणी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना अद्याप कटाईचे हत्यार, माल नेण्याचे निश्चित स्थळ व यापूर्वी किती माल नेला याचा शोध लागलेला नाही. आंध्र प्रदेशच्या वन हद्दीतील झाडाची तोड करुन महामार्गाने तस्करी करणाऱ्यावर या कारवाईमुळे लगाम लागेल, असे म्हटले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)