शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘कार्यप्रेरणा’तून केंद्र्रप्रमुख होणार प्रशिक्षित

By admin | Updated: June 1, 2015 01:21 IST

पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.

शासन निर्णय : जिल्हास्तरावर होणार प्रशिक्षणचंद्रपूर : पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाने निश्चीत केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनाकरिता राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांना येत्या शैक्षणिक सत्रात ‘कार्यप्रेरणा प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारा निवडक शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविणे, विकेंद्रीक पद्धतीने तालुका व केंद्रपातळीवर प्रशिक्षण देणे, एकात्मिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, तंत्रस्नेही शाळांना प्रोत्साहित करणे आदी कार्यक्रमाची जागृती करणे, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणेला सुलभकाची भूमिका निभवावी, यासाठी राज्यातील सर्व केंद्र प्रमुखांना जिल्हास्तरावर ‘कार्यप्रेरणा प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्यानुसार येत्या सत्रात सर्व केंद्रप्रमुखांना जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावरून स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारा कार्यप्रेरणा प्रशिक्षणास मार्गदर्शन होईल. शिक्षण विभागात विविध स्तरावर पर्यवेक्षीय व संनियंत्रण यंत्रणा काम करीत आहे. मात्र सर्व शाळा व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग व समन्वयाचा अभाव असल्याने प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट पूर्णत: साध्य झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाद्वारा नाशिक व मुंबई वगळता सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना २६ जून ते ७ जुलैदरम्यान प्रशिक्षित केले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)