शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातून चालतो विदर्भातील गांजाचा व्यापार

By admin | Updated: March 1, 2015 00:52 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दारूबंदीच्या घोषणेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी याहून चिंताजनक व गंभीर चित्र गांजामुळे निर्माण होऊ पाहत आहे.

लोकमत संडे स्पेशलरुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दारूबंदीच्या घोषणेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी याहून चिंताजनक व गंभीर चित्र गांजामुळे निर्माण होऊ पाहत आहे. याची पाळेमुळे जिल्ह्यात झपाट्याने पसरत आहे. अल्पवयीन मुलांसह तरुण पिढी या व्यसनामुळे गारद होत चालली आहे. गांजाची वाढती मागणी लक्षात घेता तस्करांनी आता रेल्वेच्या माध्यमातून गांजाची तस्करी सुरु केली आहे. दररोज लाखो रुपयांचा गांजा रेल्वे मार्गाने जिल्ह्यात पोहचविला जात आहे व येथून पुढे विदर्भातही पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.विशेष म्हणजे, पोलिसांनीही यापूर्वी केलेल्या पाचसहा कारवायामध्ये गांजा रेल्वे मार्गाने आंध्रप्रदेशातून आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही रेल्वेमार्गाने होत असलेली गांजांची तस्करी थांबविण्यात पोलिसाना अद्यापही यश का आले नाही, याबाबत आश्चर्य आहे. पोलिसांच्या पाठबळामुळेच शहरात सहजरित्या गांजा मिळत असल्याने युवापिढी व्यसनाधीन होत चालली आहे.आंध्रप्रदेशातील कागजनगर तसेस मचेंरीयालमधून रेल्वे मार्गांने लाखो रुपयांचा गांजा दररोज बल्लारशाह जंक्शनवर उतरविला जात असल्याची विश्वसनीय माहीती आहे. आंध्रातून आयात होत असलेला गांजा बराच वेळ नागरिकांनी गजबजलेल्या रेल्वे डब्यामध्ये राहतो. अशावेळी गांजाचा वास डब्बाभर पसरण्याची भीती असते. मात्र यावरही गांजा तस्करांनी नामी शक्कल लढविली आहे. गांजाचा वास रेल्वेडब्यात पसरू नये, यासाठी सर्व गांजा एकत्रित न ठेवता त्याचे दोन किलोचे वेगवेगळे गोळे तयार करुन त्यांना जाड कागदात गुंडाळले जाते. त्यानंतर ते जाड खोक्यांमध्ये व्यवस्थित पॅक करुन ठेवले जाते. त्यानंतर हा माल कोणालाही संशय न येता सरळ चंद्रपुरात पोहचविला जातो.जिल्ह्यात आठ ते दहा मोठे गांजा विक्रेते असून त्यांच्या मार्फत आलेला माल जिल्ह्यातील खेडोपाडी व गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा आदी जिल्ह्यात ट्रकच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम जोरात सुरु आहे. रात्रीच्या सुमारास किंवा पहाटेच्या वेळी बल्लारपुरात पोहचणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून हा माल येतो. बल्लारपुरात हा माल उतरविल्यानंतर तो आॅटोरिक्षा किंवा संबंधित विक्रेत्याच्या खासगी वाहनातून चंद्रपुरात आणला जातो व इप्सितस्थळी उतरविला जातो. म्हणजेच हा अवैध व्यवसात रात्री किंवा पहाटेच्या अंधारातच केला जातो. त्यामुळे कुणाला संशयही येत नाही आणि पोलिसांचा ससेमिराही टाळला जातो. उल्लेखनीय असे, मागील वर्षी आतंकवादी विरोधी पथकाने काही गांजा तस्करांना पकडले होते. त्यांच्याकडून त्यावेळी लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला होता. पकडलेला गांजा रेल्वे मार्गाने आंध्रप्रदेशातून आणल्याचे उघडकीस आले होते. त्या कारवाईनंतर काही दिवस गांजा तस्कर भूमिगत झाले होते. पण तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.या रेल्वेगाड्यातून होते तस्करीओखापुरी, नवजीवन, दक्षिण, बिकानेर, गांधीधाम या रेल्वेगाड्यानमधून मोठ्या प्रमााणात गांजा चंद्रपुरात आणला जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व गाडया रात्री तर काही पाहाटेच्या वेळेत बल्लारपुरात दाखल होतात. यावेळी काळोखच असतो.फोनवरुन होते  गांजाची बुकिंग मोठ्या व्यापाऱ्यांकडून फोनवरुनच मालाची बुकिंग केली जाते असून आंध्रातून चंद्रपूरपर्यंत माल आणण्याची जबाबदारी आंध्रातील व्यापाऱ्यांची असते. चंद्रपुरात माल उतरविल्यानंतर पैशाची देवाणघेवाण होते व नंतर स्थानिक व्यापाऱ्यांकडे माल सोपविला जातोरेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे मागील अनेक दिवसांपासून न चुकता हा अवैध व्यवसाय सुरू आहे. गांजा आंध्रातून बल्लारपुरात आणल्यानंतर तो येथील व्यापाऱ्यांच्या ताब्यात देताना अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. तरीही आजपर्यंत रेल्वे व स्थानिक पोलिसांना याची भनक लागू नये, याचे आश्चर्य वाटते. यात पोलिसांचेही हात ‘ओले’ झाले तर नसावे, अशी शंका उपस्थित होत आहे.एटीएस पथकाने केल्या होत्या कारवाया मागील वर्षी पोलिसांच्या एटीएस पथकाने गांजाविरोधी कारवाया करीत एक लाखाचा गांजा जप्त केला होता. विशेष म्हणजे महाकाली चौकीसमोरुन दोघांना अटक केली होती. पुढे पोलिसांच्या तपासात आंध्रप्रदेशातील ठोक विक्रत्यांची नावे उघडकीस आली होती. जप्त केलेला गांजा रेल्वे मार्गाने आंध्रातून आणल्याची कबुली आरोपींनी दिली होती. यात एका महिलेचाही समावेश होता.