शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आज तुकूम विभागात विक्रमी भूमिपूजन

By admin | Updated: September 4, 2016 00:50 IST

राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या चंद्रपूर शहर विकास निधीतून तुकूम विभागातील ...

८२ रस्ते : पाच कोटी रुपयांचे क्राँक्रिटीकरण व डांबरीकरणचंद्रपूर : राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या चंद्रपूर शहर विकास निधीतून तुकूम विभागातील प्रभाग क्र. १ मधील १ कोटी ८६ लाख रुपयांच्या ४७ रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रीटकरण व डांबरीकरण बांधकामाचा भूमिपूजन समारंभ व जाहीर सभेचे आयोजन ४ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले आहे. एकाच दिवशी ४७ रस्त्यांचे विक्रमी भूमिपूजन चंद्रपुरातील तुकूम प्रभाग १ मध्ये होणार असून तुकूम प्रभागाच्या विकासासाठी अथक परिश्रम करणारे भाजपचे नेते सुभाष कासनगोट्टूवार यांचे या परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या विकासावर भर दिला असून त्याकरिता चंद्रपूर शहर विकास निधीअंतर्गत ४० कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नऊ कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ ४ सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी करण्यात येत आहे. नऊ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामांमध्ये १.८६ कोटी रु. प्रभाग क्र. १ मध्ये ४ सप्टेंबर रोजी ४७ रस्त्याच्या बांधकामाचा प्रारंभ होत आहे. या कार्मक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असून अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, सभापती देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे. या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.३० वाजता निर्माण नगर ग्राऊंड, लॉ कॉलेज समोर, तुकूम येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार, प्रमोद शास्त्रकार, माया मांदाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी) चंद्रपूर शहर विकास निधी !विकासातून चंद्रपूर शहराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ४० कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर शहराला प्राप्त करून असून या निधीतून मनपा हद्दीतील परिसराचा विकासावर भर दिला गेला आहे. त्यामधून तुकूम प्रभाग क्र. १ मध्ये एकाच वेळी ४७ रस्त्यांचे विक्रमी भूमिपूजन होणार आहे. यावेळी ३० कॉलनीमधील नागरिकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रस्त्याचे भूमिपूजन हे ११ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आवर्जून उपस्थित राहणार आहेत.