शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

झरण वनपरिक्षेत्रात लाकूड कटाईची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST

संचारबंदीच्या काळात वन अधिकारी व कर्मचारी संचारबंदीच्या अटी व नियमानुसार वनांमध्ये गस्त करणे, आगीपासून जंगलाचे सरक्षण करणे, वन्यप्राण्याचे शिकारीपासून रक्षण करणे, अवैध तोड रोखणे यासारख्या अत्यावश्यक सेवा झरण वनपरिक्षेत्रात पुरविल्या जात आहेत. रोपवन करण्याकरिता पूर्व पावसाळी कामे करणे अत्यंत गरजेचे असल्याने मध्यचांदा विभागातील इतर वनपरिक्षेत्राप्रमाणे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४ व इतर ठिकाणी संचारबंदीचे नियम पाळून कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये स्थानिक मजुरांना मिळाले काम : फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : आज कोरोना महामारीमुळे देशभरासह राज्यावर मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यामुळे संचारबंदीचा कालावधीला सव्वा महिना पूर्ण झाला असून आणखी तो वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्याला आर्थिक संकटापासून सावरण्यासाठी शासनाने शेती व्यवसाय, मत्स व्यवसाय तसेच काही उद्योगधंद्यांना संचारबंदीच्या अटी व नियमांचे पालन करून शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे झरण वनपरिक्षेत्रातर्गत लाकूडकटाईची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे.संचारबंदीच्या काळात वन अधिकारी व कर्मचारी संचारबंदीच्या अटी व नियमानुसार वनांमध्ये गस्त करणे, आगीपासून जंगलाचे सरक्षण करणे, वन्यप्राण्याचे शिकारीपासून रक्षण करणे, अवैध तोड रोखणे यासारख्या अत्यावश्यक सेवा झरण वनपरिक्षेत्रात पुरविल्या जात आहेत. रोपवन करण्याकरिता पूर्व पावसाळी कामे करणे अत्यंत गरजेचे असल्याने मध्यचांदा विभागातील इतर वनपरिक्षेत्राप्रमाणे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४ व इतर ठिकाणी संचारबंदीचे नियम पाळून कामे सुरू आहेत. शासन नियमानुसार कामावर असलेल्या मजुरांना मास्क, सॅनिटायझर आणि वेळोवेळी हात धुण्यासाठी साबण इत्यादीचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुक्यातील काही गावांना रोजगार उपलब्ध होत आहे. मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने शासनाच्या जीआरनुसार सोशल डिस्टन्स पाळून मजुरांकरवी काम सुरु आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवण्यात आले असून खबरदारी घेतली जात आहे.-अनिकेत मोटे, वनाधिकारी वनपरिक्षेत्र झरण.

टॅग्स :forest departmentवनविभाग