शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातूनच कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास शक्य

By admin | Updated: January 25, 2015 23:11 IST

समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतीसोबत शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असून शिक्षणामधूनच

चंद्रपूर : समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतीसोबत शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असून शिक्षणामधूनच समाजाचा विकास होत असल्याचे मत राजुरा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी येथे केले. खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूरतर्फे स्थानिक मातोश्री सभागृह तुकूम येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे कुणबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विजय देवतळे होते. विशेष अतिथी म्हणून कवी ज्ञानेश वाकुडकर, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कलावती वाकुलकर, भाजपाचे महासचिव खुशाल बोंडे, जि.प. चंद्रपूरच्या माजी सभापती आसावरी देवतळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर, डॉ. बी.के. लोणारे, मनोज कळसकर, अमरावतीचे शाहुराव भोयर, नागपूरचे चंद्रकांत नवघरे, चौधरी, नथ्थू आरेकर, वृषाली धोटे, नितीन पिपरे, देवेंद्र बट्टे यांची उपस्थिती होती तर सत्कारमूर्ती म्हणून जि.प. चंद्रपूर महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे, पोंभूर्णा समितीचे सभापती बापू चिंचोळकर, गोंडपिपरीचे पंचायत समितीचे उपसभापती रामचंद्र कुरवटकर, हरिशचंद्र पाल, समाजाचे सहसचिव दिनकर ठोंबरे यांची उपस्थिती होती.यावेळी सरिता कुडे, बापू चिंचोलकर, रामचंद्र कुरवटकर, हरिचंद्र पाल, दिनकर ठोंबरे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मेळाव्याला सहकार्य करणारे वृषाली धोटे, मनोज कळसकर, विलास कोळसे, संजय महाजन, किशोर डोमकावळे, सचिन करुटकर, विजय कळसकर, डॉ. राजू धानोरकर, गोपीनाथ भोयर, देवेंद्र बट्टे, प्रशांत फाले, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वधू-वरांचे माहिती असलेल्या ऋणानुबंध या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन समाजाचे सचिव जे.डी. पोटे यांनी केले. (प्रतिनिधी)