शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

वीज वापरातील तीन महिन्यांचे देयक अचूकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा दावा : वीज ग्राहकांवर नाही अतिरिक्त भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मेसह जून महिन्याचेही देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित देयक स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आला नाही, असा दावा महावितरणने केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज देयकांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देयक दुरूस्तीसाठी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीज बिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. शिवाय वेबपोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटर रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला २ लाख ६५ हजार वीज ग्राहकांनी प्रतिसाद देऊन स्वत:हून मीटर रिडींग पाठविले. त्यांना वीज वापराचे अचूक मासिक देयक देण्याचे काम सुरू आहे. उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेले सरासरी वीज देयक दुरूस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र्र सुरू आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीज ग्राहकांना लॉकडाऊन कालावधी मधील एप्रिल, मे व जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. ग्राहकांनी आपल्या वीज देयकासंदर्भात अडचणी असल्यास वेबपोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे संपर्क साधावा, अशी माहिती महावितरणने दिली आहे.प्रत्येकी १०० युनिटला स्लॅब दरग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीज देयक आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिट स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिट स्लॅब दर लावण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत वापरलेली युनिट संख्या दर्शवून ३१ मार्च २०२० पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले. लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर आणि १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जूनचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीज देयक अधिक युनिट व रकमेचे असण्याची शक्यता आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे.

टॅग्स :electricityवीज