बल्लारपूर : आंध्रप्रदेशातील खम्मम येथून आंध्र एक्सप्रेस या रेल्वे सुपर गाडीतून गांजा नेत असताना बल्लारशा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी कारवाई करून बॅगमध्ये लपून असलेल्या तीन लाख ८८ हजार ६७० रुपये किमतीचा ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी ११:३० वाजता करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}हा गांजा नेत असताना सुखबिर सिंह प्रताप सिंह (४५) रा. आग्रा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गांजा जप्त केला आहे. ही कारवाई बल्लारशहा रेल्वे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सय्यद अहमद आणि रेल्वे सुरक्षा दलाचे आयपीएस नरसिंहलु यांनी संयुक्तपणे केली. रेल्वेने आंध्रामधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची बºयाच दिवसांपासून चर्चा होती.