जि.प.शाळेत चोरीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:01+5:302021-09-10T04:35:01+5:30
४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास नवखळा येथीलच ललित आकाश नाहे व बाल्या परमानंद अलमस्त यांनी जिल्हा ...

जि.प.शाळेत चोरीप्रकरणी तिघांना अटक
४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास नवखळा येथीलच ललित आकाश नाहे व बाल्या परमानंद अलमस्त यांनी जिल्हा परिषद शाळेतील संगणक खोलीची खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य व एलईडी चोरून नेले होते. शाळा उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रक्रार लक्षात येताच शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला व तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना बुधवारी रात्री अटक करून विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला. चोरी गेलेले काही साहित्य मनोज पत्रू घरत यांच्या घरी आढळून आले. आणखी काही साहित्य अजूनही पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती आहे. गुरुवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.