शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

चंद्रपुरातील तीन हौशी सायकलस्वारांनी घातली ३०० किलोमीटरला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 12:46 IST

चंद्रपूरच्या तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देसाहसी सायकलिंगनागपुरातील झिरो माईल स्टोनपासून सायकलिंगचा प्रारंभ

चंद्रपूर : हवामान आणि भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता शरीरासोबतच मनाची कसोटी पणाला लावणारा लांब पल्ल्ल्याचा साहसी सायकलिंग प्रकार अर्थात ब्रेव्ह झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने रविवारी एक विक्रम आपल्या नावावर नोंदविला. जिल्ह्यातील तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरच्या अंतराला गवसणी घालत हे दिव्य पेलले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सुनील जुनघरे, अब्दुल आबिद कुरेशी आणि पीयूष कोटकर या तिघांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. सायकलस्वारांना चंद्रपूरपर्यंत पोहोचून परत नागपूरला जाण्यासाठी २० तासांचा कालावधी देण्यात आला होता. त्यासाठी ३७ साहसी सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. एक सायकलस्वार वगळला तर यात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व ३६ सायकलस्वारांनी या ३०० किलोमीटर अंतराला गवसणी घातली.

या ब्रेव्हेसाठी विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, वरूडसह मध्य प्रदेशातील जबलपूर व कर्नाटकातील बंगळुरू येथूनही साहसी सायकलस्वार सहभागी झाले होते. हे ३०० किलोमीटरच्या अंतराचे साहस पूर्ण करणाऱ्यांमध्ये नागपुरातील स्वाती, अजय कुलकर्णी, ॲनी विल्किन्सन, अमरावती जिल्ह्यातील अमिता, श्रीराम देशपांडे, राधा राजा, अंजली देशमुख, अतुल कळमकर, आदित्य उपासे. पीयूष खंडेलवाल, आदित्य लोखंडे, पराग भोंडे, बंगळुरूचे चेतन घोरपडे. जबलपूरचे मौसम पालेवार, मौदाचे लीलाधर ठवकर, प्रशांत चंदनखेडे, यवतमाळचे लियाकत हुसेन, नरेंद्र पहाडे यांचा समावेश होता. योगेश दापूरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, मंगेश पहाडे यांनी सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सायकलस्वारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून विकास पात्रा व अमोल रामटेके यांनी व्यवस्थापन केले.

टॅग्स :SocialसामाजिकCyclingसायकलिंगJara hatkeजरा हटके