पिसाळलेल्या वानराने पुन्हा एकाला केले जखमी

By Admin | Updated: June 8, 2015 01:48 IST2015-06-08T01:48:31+5:302015-06-08T01:48:31+5:30

येथे पिसाळलेल्या वानराचा धुडगूस सुरूच असून आणखी एकाला चावा घेतल्याने गावात दहशत पसरली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

The thorny monkey has been injured in the attack | पिसाळलेल्या वानराने पुन्हा एकाला केले जखमी

पिसाळलेल्या वानराने पुन्हा एकाला केले जखमी

वानर सापडेना : नागरिकांत दहशत
सिंदेवाही : येथे पिसाळलेल्या वानराचा धुडगूस सुरूच असून आणखी एकाला चावा घेतल्याने गावात दहशत पसरली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
वनविभागाने शनिवारी पिसाळलेल्या वानराला बेशुद्ध करुन पकडले होते. पण पकडलेला वानर पिसाळलेला नव्हेच, असे नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा वनविभागने तोच वानर आहे व त्याच्या सोबती पुन्हा वानर आहे, असे सांगितले. पण सायंकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान आंबेडकर चौकात बोरकर यांच्या घरी लग्नकार्यासाठी आलेल्या दापका बोडधा येथील सचिन रामदास निकुरे (२८) हा पाहुणा जात असताना मदनापूर वॉर्ड येथील रस्त्यावर अचानक वानराने उडी घेतली व हल्ला करून जखमी केले. त्यांच्या हाताला मार असून तो ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचार घेत आहे. वनविभागाने दोन दिवसांपासून वानराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र पिसाळलेला वानर अद्याप गवसलेला नाही. वानर वारंवार नागरिकांवर हल्ले करीत असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. मदनापूर वॉर्ड आंबेडकर चौक, जयस्वाल कॉलनी, हेटी वॉर्ड या भागात या पिसाळलेल्या वानराची दहशत असून वानराला मारावे किंवा त्वरित पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The thorny monkey has been injured in the attack