शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

त्या आगीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते

By admin | Updated: March 27, 2016 00:36 IST

पै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील,..

लाखोंचे नुकसान : आगग्रस्तांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आपबितीघनश्याम नवघडे नागभीडपै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील, अशा त्या आगेत सापडलेल्या चिमुकल्याचा टाहो ते ऐकत होते. पण ते काहीच करू शकत नव्हते. आगीचे रूपच एवढे रौद्र होते की, तिच्यापुढे काहीच चालत नव्हते. येनोलीवासीय ‘लोकमत’ जवळ आपबिती सांगत होते.मन हेलावणारी ही घटना नागभीड तालुक्यातील येनोली येथे शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली. बाळापूरपासून हे गाव चार किमी अंतरावर असले तरी पूर्णत: जंगलव्याप्त आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम २५० ते ३०० आहे. त्यातही आदिवासी ढिवर समाजाची या गावात संख्या अधिक आहे. शुक्रवारी आपले जेवण वगैरे आटोपून गावकरी चौकात चर्चेसाठी नेहमीप्रमाणे बसले. गावातील नान्हे आणि कुभले कुटुंबियसुद्धा या चर्चेत सहभागी झाल होते. घरात मुलगा झोपला आहे, म्हणून त्यांनी त्याच्याजवळ दिव्याचा प्रकाश राहावा या हेतूने दिवा लावला आणि बाहेरून दाराची कडी लावून ते सुद्धा चर्चेत सहभागी झाले. नेमका याच दिव्याने घात केला. दिवा पडला की कशाच्या तरी धक्क्याने तो पडला, हे कळायला मार्ग नाही. पण याच दिव्याने घराला आग लागली आणि ती सर्वत्र पसरली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर कवेत घेतले. जवळच चौकात चर्चा करीत असलेल्या लोकांच्या लक्षात ही आग आली. लोक आग विझविण्यासाठी धावले. मिळेल त्या ठिकाणावरुन पाणी आणून आग विझवू लागले.याचवेळी घरात झोपलेल्या अर्जुन दिवाकर नान्हे हा तिसरीत शिकणारा चिमुकला चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे आगीच्या लोळात पूर्णपणे सापडला होता. दाराची कडी बाहेरून बंद असल्यामुळे त्याला बाहेरून पळता येत नव्हते. आगीमुळे दाराची कडी काढून त्याला बाहेर काढणे कोणाच्याच हाती उरले नव्हते. काही वेळाने आगीने आपले रौद्ररूप शमविल्यानंतर त्या चिमुकल्या अर्जुनला बाहेर काढण्यात आले. या आगीत अर्जुन ७० टक्के जळाल्याची माहिती आहे. आता तोे नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.सदरप्रतिनिधीने येनोली या गावाला भेट दिली असता, घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती. आपली नेहमीची कामे सोडून गावातील नागरिक विषण्ण नजरेने या घटनेचीच चर्चा करीत होते. गावावर एखादे संकटच कोसळले अशी भावनाच त्याच्यांत दिसून आली.वीज पुरवठ्यासाठी केला होता अर्जयावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, पिडीत कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वीच बीपीएलसाठी असलेल्या योजनेतून वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला होता. पण संबंधित विभागाकडून त्यांच्या अर्जाची दखलच घेण्यात आली नाही. अर्जाची वेळीच दखल घेण्यात आली असती तर त्यांच्यावर रॉकेलचा दिवा लावण्याची वेळ आली नसती व अशी घटनाही घडली नसती.तहसिलदारांची तत्परताआगीची माहिती समजताच येथे कालपरवाच रूजू झालेले तहसिलदार समीर माने यांनी आपल्या ताफ्यासह रात्रीच येनोलीला भेट दिली. पिडीत कुटुंबाचे संसारपयोगी संपूर्ण साहित्यच आगीत भस्म झाल्याने प्रत्येकी दहा किलो अन्न धान्याची व्यवस्था केली, अशी माहितीही गावकऱ्यांनी दिली.