तलवारीने सपासप वार करून फेकले होते नदीत; वर्ध्याच्या वाळूमाफिया टोळीवर मकोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:40 IST2026-03-10T13:39:17+5:302026-03-10T13:40:28+5:30

Chandrapur : बामर्डा रेती घाटातील पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निघृण हत्या करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी 'मकोका' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.

They stabbed a person with swords and thrown into the river; MCOCA on the sand mafia gang of Wardha | तलवारीने सपासप वार करून फेकले होते नदीत; वर्ध्याच्या वाळूमाफिया टोळीवर मकोका

They stabbed a person with swords and thrown into the river; MCOCA on the sand mafia gang of Wardha

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा (चंद्रपूर):
बामर्डा रेती घाटातील पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निघृण हत्या करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी 'मकोका' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. संघटित टोळी बनवून दहशत निर्माण करणाऱ्या अमोल कामडी आणि त्याच्या ११ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

१ मार्च २०२६ रोजी बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून टोळीने सशस्त्र हल्ला केला होता. पोकलैंड मशीन आडवी लावून रस्ता अडवत आरोपींनी फिर्यादी पंकज वानखेडे आणि त्यांच्या साथीदारांना घेराव घातला. हातात तलवारी आणि लाकडे घेऊन आलेल्या या टोळीने भरत नागपाल याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तलवारीने सपासप वार करून त्याला नदीच्या खोल पात्रात फेकून दिले. या हल्ल्यात भरतचा मृत्यू झाला होता. इतकेच नव्हे, तर आरोपींनी गाड्यांची तोडफोड करून त्या डिझेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला होता. वरोरा पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करून वर्धा आणि इतर भागातील १२ आरोर्पीना अटक केली होती. ही टोळी केवळ रेती चोरीच नव्हे, तर खून, खुनाचा प्रयत्न, अवैध दारूविक्री आणि जुगारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. 

हे आहेत मकोकाचे आरोपी

अमोल रामचंद्र कामडी (३६), सौरभ दिलीपसिंग ठाकूर (३६), अक्षय विजयराव खडसे (२८), उदय भास्कर वांदिले (२४), नितीन यशवंत कामडी (२५), प्रफुल्ल सूर्यभान उमाटे (४२), सुनील नारायणराव झोरे (३७), अतुल पुरुषोत्तम मोटघरे (४७) सर्व रा. वर्धा, अजय ऊर्फ गोलू इरपाचे (३० रा. मध्यप्रदेश), प्रकाश शंकर कासारे (४७), प्रवीण कवडुजी वासेकर (४७) दोघेही रा. हिंगणघाट, गीतेश वसंतराव सातपुते (३७, रा. भद्रावती) असे मकोका लागलेल्या आरोपींचे नाव आहे.

आर्थिक फायद्यासाठी दहशत माजवून संघटितपणे गुन्हे करणाऱ्या या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 'मकोका'चा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता.

या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के व स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल काचोरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले करत आहेत.

Web Title : रेत माफिया पर मकोका: युवक की हत्या, नदी में फेंका, गिरोह पर आरोप

Web Summary : चंद्रपुर पुलिस ने भरत नागपाल की हत्या के मामले में 12 रेत माफिया सदस्यों पर मकोका लगाया। अमोल कामडी के नेतृत्व में गिरोह ने हिंसा, अवैध शराब और जुए से इलाके में आतंक मचाया था। पुलिस जांच जारी है।

Web Title : Sand Mafia MCOCA: Youth Murdered, Thrown in River, Gang Charged

Web Summary : Chandrapur police invoked MCOCA against 12 sand mafia members for murdering Bharat Nagpal over money. The gang, led by Amol Kamdi, terrorized the area with violence, illegal liquor, and gambling. Police investigation is ongoing.