ते तांदूळ प्लास्टिकचे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:43+5:302021-09-22T04:31:43+5:30
अंगणवाडी केंद्रांमधून प्लास्टिक तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे वृत्त येत आहे. मात्र हे वृत्त निराधार आहे. पुरवठा होत असलेले ...

ते तांदूळ प्लास्टिकचे नाहीत
अंगणवाडी केंद्रांमधून प्लास्टिक तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे वृत्त येत आहे. मात्र हे वृत्त निराधार आहे. पुरवठा होत असलेले तांदूळ केंद्र शासनाकडून जुलै २०२१ पासून फोर्टीफाइड तांदळाचा प्रथमच पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणारे फोर्टीफाइड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे. लाभार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्याकरिता फोर्टीफाइड तांदूळ देण्यात येत आहेत. या तांदळामध्ये विविध पोषक घटकांचा समावेश करून हे फोर्टीफाइड तांदूळ बनविण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांना अधिकची पोषक तत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने हे तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये, अशी माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे यांनी दिली.