शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

कोरोनाकाळात कौटुंबिक हिंसाचारात झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

परिमल डोहणे चंद्रपूर : कोरोना काळात जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली ...

परिमल डोहणे

चंद्रपूर : कोरोना काळात जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात १७९६ कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी भरोसा सेलकडे नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील २०५ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करीत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १७९६ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २०५ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर ७१० प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. मागील वर्षी सन २०१९ मध्ये २०५२ तक्रारी दाखल झाल्या. तर जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये २८४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १९७ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.

बॉक्स

नोकरी गेली, माहेरून पैसे आण

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. यासोबत मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. तर अनेक प्रकरणात सासू-सासऱ्याचा हस्तक्षेप, पतीचे व्यसन, विवाहबाह्य संबंध, मुला-मुलींचे अफेअर आदी कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत आहे. मात्र भरोसा सेलमुळे अनेक प्रकरणात समझोता होत असल्याची समाधानकारक बाब पुढे आली आहे.

बॉक्स

७१० प्रकरणात तडजोड

सन २०२० मध्ये १७९६ तक्रारी चंद्रपूर भरोसा सेलकडे दाखल झाल्या. जुन्या प्रलंबित २५३ प्रकरणे मिळून २०४९ प्रकरणांपैकी ७१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. २०५ प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला.

बाॅक्स

२०१९ मध्ये नोंदवलेली प्रकरणे - २०५२

२०२० मध्ये नोंदवलेली प्रकरणे-१७९६

जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये नोंदवलेली प्रकरणे -२८४

कोट

कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे तक्रारी येत आहेत. समुपदेशातून प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात. महिलांनी कुटुंबाच्या प्रतिष्ठेला न घाबरता अन्यायाला वाचा फोडावी.

-अश्विनी वाकडे

पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर