क्रूरतेचा कळस; गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ केला व्हायरल

By परिमल डोहणे | Updated: June 8, 2025 20:37 IST2025-06-08T20:37:42+5:302025-06-08T20:37:50+5:30

बल्लारपुरातील घटना : पोलिसांनी सात जणांना ठोकल्या बेड्या

The height of cruelty; Video of unnatural act with cow goes viral | क्रूरतेचा कळस; गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ केला व्हायरल

क्रूरतेचा कळस; गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ केला व्हायरल

चंद्रपूर : गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची खळबळजनक घटना बल्लारपुरात रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. यात अनैसर्गिक कृत्य करणारा प्रल्हाद भाटू राठोड (६५), आक्षेपार्ह व्हिडीओ बनवणारा विजय मोहन पाल (२२), व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करणारे हर्षल ऊर्फ गोलू रमेश घोटेकर (२७), विजय मधुकर ढोके (२६), पुरुषोत्तम ज्ञानबाजी सहारे (४२), नरेश शिवा वर्मा (३२) सर्व रा. बल्लारशाह यासह बकरी ईदच्या दिवशी जाणीवपूर्वक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकणारा शुभम सुधाकर खोब्रागडे (२९) रा. वृंदावननगर, चंद्रपूर यास अटक केली आहे. हा व्हिडीओ मार्च महिन्यातील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

६ जून रोजी इट्स चंद्रपूर या इन्स्टाग्राम पेजवर ‘रात गोमाता के साथ, दृष्कर्म का प्रयास’ या शीर्षकाखाली बल्लारपूर-कारवा रोडवर गोमातेसह अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ७ जून रोजी बकरी ईद असल्याने हा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच पसरला. मात्र, व्हिडीओमुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने बजरंग दल व आदी संघटनेने आक्षेप घेतला. दरम्यान सुभाष वाॅर्ड, बल्लारपूर येथील सत्यनारायण खेंगर यांनी बल्लारपूर ठाण्यात तक्रार दिली. बल्लारपुरातील ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी कलम २९९, ३ (५) बीएनएस सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा नोंदवून तपासास सुरुवात करून अनैसर्गिक कृत्य करणारे, व्हिडीओ बनवणारे व व्हिडीओ शेअर करणाऱ्या सातही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम जी. गव्हाणे, एपीआय मदन दिवटे, पीएसआय प्रेमशहा सय्याम, संतोष दंडेवार, शरदचंद्र कारुष, वशिष्ट रंगारी, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड आदींनी केली.

आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करू नये

कोणतेही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामधील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशा प्रकारचा कोणताही आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर दिसून आल्यास त्याला प्रसारित करण्यापेक्षा त्याची माहिती सायबर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे किंवा नजीकच्या पोलिस स्टेशनला द्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: The height of cruelty; Video of unnatural act with cow goes viral