शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona Virus in Chandrapur; सीमेलगतच तेलंगणातील कोरोनाबाधितांचा जिवतीवासीयांना धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 9:26 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देसीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढलासीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा तेलंगणाशी सतत संपर्क

संघरक्षित तावाडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात कोरोना रोगाने थैमान घातले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात अजून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही आणि आढळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतत काळजीही घेत आहे. मात्र जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे जिवती तालुक्यातील सीमेवरील वादग्रस्त १४ गावे ही दोन्ही राज्यात येत असून येथील नागरिक हे चंद्रपूर आणि आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यातच या गावांचा व्यवहार, संपर्क हा दोन्ही राज्यात नित्याचाच असतो.तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका सीमेला लागून असून सध्या या जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण सापडले आहेत. सीमेवरून वीस ते पंचवीस किमी अंतरावरील हसणापूर (जिल्हा आदिलाबाद) गावात यापैकी एक रुग्ण असल्याने आणि सीमेवरील १४ गावांचा नेहमी संपर्क येत असल्याने त्याचा संसर्ग आपल्याकडे तर येणार नाही ना असे तर्कवितर्क ऐकायला मिळत आहे. सीमेवरील लोकांचे बँक व्यवहार दोन्हीकडे येतात. त्यामुळेसुद्धा एकमेकांचा संपर्क येणार तर नाही ना, अशी भीती लोकांत आहे. तालुका प्रशासनाने याची काळजी सुरुवातीलाच घेतली आहे. सीमेवर प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. परमडोली, येलापूर, लेंडीगुंडा याठिकाणी नाकाबंदी असून पोलिसांसोबत त्या त्या गावातील नागरिकही बंदोबस्तासाठी पहारा देत आहेत. जिवती तहसीलदार तसेच ठाणेदार यांच्याकडूनही सदर १४ गावातील नागरिकांत सध्या तेलंगणात जाऊ नका, घाबरण्याचे काही कारण नाही याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.सीमेवरील प्रत्येक ठिकाणी पोलीस व गावकऱ्यांचा बंदोबस्त ठेऊन पहारा लावण्यात आला आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. घराबाहेर जाणे टाळावे.- महेश देवकते, उपसभापती, पं.स.जिवतीकुंभेझरी ग्रामपंचायतीकडून तहसीलदाराला निवेदनसीेमेवरील लोकांना दोन्ही राज्यात राशन सुविधा असून येथील लोक हे दोन्हीकडे राशन आणण्यासाठी जात आहेत. विशेष म्हणजे, केरामेरी मंडलमध्ये एक कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यात याचा धोका होऊ नये, यासाठी सीमामार्ग बंद करा, अशा आशयाचे निवेदन कुंभेझरी ग्रामपंचायतीने तहसीलदार जिवती यांना दिले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस