कापूस उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:14+5:302021-01-18T04:26:14+5:30

गोवरी : राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, ...

Tears in the eyes of cotton growers | कापूस उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

कापूस उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

Next

गोवरी : राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुराळा उडत असतो. परिणामी, धुळीमुळे कापसाची प्रतवारी घसरली असून उत्पादनातही घट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर बोंडअळी आणि या धुळीमुळे शेतकरी बेजार झाले आहेत.

या परिसरात कोळसा खाणी असल्याने पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे.

दिवसंरात्र सुरू असणारी जड वाहतूक व त्यापासून होणारे प्रदूषण हाही चिंतेचा विषय झाला आहे. मात्र, याकडे लक्ष द्यायला सध्या तरी कुणाकडेही वेळ नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या परीने होईल तेवढी मेहनत करून उत्पादन घेत आहेत.

कापसाला भाव नसल्याने कवडीमोल दरात आपला कापूस विकावा लागत आहे. या काळ्या पडलेल्या कापसाला बाजारपेठेत कवडीमोल दर दिला जात आहे. त्याचा सारा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

--

Web Title: Tears in the eyes of cotton growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.