शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा वनवास संपेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 00:53 IST

गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या न झाल्याने त्याचा फटका अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना

विषय शिक्षकही रुजू व्हायला तयार नाहीत : कर्मचाऱ्यांना जिवती तालुक्याची अ‍ॅलर्जीसंघरक्षित तावाडे । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या न झाल्याने त्याचा फटका अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना नेहमीच सहन करावा लागला आहे. बदली प्रक्रिया होत नसल्याने त्याच दुर्गम ठिकाणी किती वर्ष काढायचे हा प्रश्न त्यांना पडतो आहे. जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यात अनेक शिक्षकांना १३ ते १४ वर्षे झालीत. तरीही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. कारण यात राजकारण आड येत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या शिक्षक संघटना या मजबूत असून संघटनेचे पदाधिकारी नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात. त्यातच जिवतीसारख्या दुर्गम भागात जाण्याची त्यांच्यात असलेली ‘अ‍ॅलर्जी’ हे सर्व कारणे यासाठी कारणीभूत आहेत. विषय शिक्षकांच्या बाबतही तसेच आहे. नुकत्याच विषय शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये जिवती तालुक्यातून ७८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या ठिकाणी ७८ ऐवजी केवळ नऊ शिक्षकच आले. बाकी शिक्षक अजूनही आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात जिवती तालुक्याबद्दल अ‍ॅलर्जी तर दिसतेच. परंतु विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विषय शिक्षक पदस्थापना पूर्णता चुकीची झाल्यामुळे तालुक्यावर अन्याय झाला असून उर्वरित ६९ पदे खाली आहेत. त्याचे काय? विषय शिक्षक समुपदेशनाने न पाठविता रिक्त जागेवर त्यांना पाठविले असते तर जिल्ह्यातील सर्व शाळांना विषय शिक्षक मिळाले असते, असे मत पंचायत समिती उपसभापती महेश देवकते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तालुक्यात अनेक शाळा वर्ग १ ते ८ पर्यंतच्या आहेत. पण त्या शाळेत केवळ १ ते २ शिक्षकच गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देण्याऐवजी, आहे त्याही विषय शिक्षकांच्या बदल्या करीत आहे.