शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

७ तारखेच्या आत शिक्षकांचा वेतन आढावा घेणार

By admin | Updated: October 30, 2014 22:49 IST

जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न होवून बसला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्येही काही तालुक्यात शिक्षकांना वेळेवर वेतन मिळाले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली.

चंद्रपूर : जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न होवून बसला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्येही काही तालुक्यात शिक्षकांना वेळेवर वेतन मिळाले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली. काही ठिकाणी शालार्थ वेतन प्रणालीच्या आड मुद्दाम काही शिक्षकांचे व शाळांचे वेतन थांबवण्याचे प्रकार सुरू आहेत. या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत प्रत्येक पंचायत समितीमधून वेतनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात येईल व दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.जिल्हा परिषदेमार्फत वेतनाबाबत पंचायत समितीकडून आॅनलाईन आढावा घेण्यात येणार आहे. जि.प. पासून ते शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होताना वेतन देयकाचा संपूर्ण टप्प्यांचा अहवाल आता पंचायत समिती अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेला वेळोवेळी सादर करावा लागणार आहे.शालार्थ वेतन प्रणाली शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये कार्यालयातील लिपीकाचे काम कमी होवून मुख्याध्यापकच वेतन काढण्याची कार्यवाही करत आहेत तसेच हे काम त्यांना आॅनलाईन करावे लागते, परिणामी अनेक मुख्याध्यापकांना ते जमतही नाही तेव्हा ते इतरांची मदत घेवून अतिरिक्त पैसे खर्च करून कसेबसे वेतन देयक वेळेवर सादर करतात. मात्र वेतन प्रक्रियेचे संपूर्ण काम कमी होवूनही पंचायत समितीस्तरावरील कर्मचारी, अधिकारी कारण नसताना दिरंगाई करतात व कधीच वेळेवर वेतन देत नाहीत. कधी शालार्थ वेतनप्रणालीचे तर कधी जिल्हास्तरावरुन निधी न आल्याचे कारण सांगतात. पंचायत समिती स्तरावर आलेली आॅनलाईन देयके तपासून जिल्हास्तरावर पाठविण्याचे अगदी सोपे काम या कर्मचाऱ्यांना असते. तेही स्वत: न करता या कामात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांवर काम सोपविले जाते. त्यामुळे हेतुपुरस्परपणे काही शिक्षक व शाळांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने केला.या अनियमितेची चौकशी करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, मोरेश्वर बोंडे, वासुदेव गौरकार, सुभाष बेरड, चंदा खांडरे, शालिनी देशपांडे, विनोद कुमारे, भास्कर डांगे, पंकज उद्धरवार, कुमरे, मोरेश्वर हनमलवार यांच्यासह संघटनेतील अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)