शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर विभागाचे काम कंत्राटदाराकडे

By admin | Updated: September 11, 2014 23:23 IST

चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे.

५० कोटींचे उद्दिष्ट : कंत्राटदार करणार मालमत्तेचे मूल्यांकनचंद्रपूर : चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे. कर विभागाने या संपत्तीचे कधी फेरमुल्यांकनच केले नाही. त्यामुळे अनेकांना सहज कर चुकविता आला. मात्र मनपाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. यावर तोडगा काढण्यासाठी मनपाने आता शहरातील मालमत्तेचे पुनर्सवेक्षण करण्याचे पुण्यातील एका कंपनीला कंत्राटच देऊन टाकले आहे.अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरात अनेक बदल घडून आले आहेत. औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सहाजिकच व्यापारीकरणही वाढले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आपल्या निवासी इमारतींमध्ये फेरबदल करीत येथे व्यापारी प्रतिष्ठाने काढली आहे. इमारतींमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने असली की या इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतरण होते. अशा इमारतींचा महानगरपालिकेकडे जो रेकॉर्ड असतो, त्यातही बदल केला जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार गृहकर आकारला जातो. सहाजिकच निवासी इमारतींपेक्षा व्यावसायिक इमारतींसाठी जास्त कर आकारला जातो. मात्र हा कर वाचविण्यासाठी नागरिकांकडून मनपा कर्मचाऱ्यांची मनधरणी केली जात आहे. यातून पुढे अर्थकारणही होत असल्याचे शंका आहे. याचाच परिणाम म्हणून मनपाच्या रेकॉर्डवर शहरातील अनेक अशा इमारती व्यावसायिक इमारतीत रुपांतरित होऊ शकल्या नाही. त्यामुळे अशा इमारतीचे मालक निवासी इमारतींचाच कर भरीत होते. या कर चुकवेगिरीमुळे मनपाला कोट्यवधींचा फटका बसत होता. मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी या करचुकवेगिरीवर अंकूश लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी नवीच युक्ती काढली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील मालमत्तेचे पुनर्सवेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचाऱ्यांऐवजी हे काम पुणे येथील एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. ही कंपनी मालमत्तेचे सर्वेक्षण करेल. त्यानंतर कोणती इमारत व्यावसायिक आहे व कोणती रहिवासी याचे वर्गीकरण करेल, मालमत्तेचे व्हॅल्युएशन करेल. याबाबतचा सर्व डाटा संगणीकृत करून मनपाच्या स्वाधीन करेल. त्यानंतर मनपा कर वसूल करणार आहे. (शहर प्रतिनिधी)