शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी टाटांनी दिला मदतीचा शब्द

By admin | Updated: January 6, 2017 01:07 IST

५ जानेवारी हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी इतिहासात नोंद राहील असा ठरला.

देखणा समारंभ : विकासाचे नवे पर्व सुरू ; नागरिकांची भरगच्च उपस्थिती चंद्रपूर : ५ जानेवारी हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी इतिहासात नोंद राहील असा ठरला. कितीतरी वर्षांपूर्वी जेआरडी टाटा चंद्रपुरात आले होते. चंद्रपुरातील लोह, सागवान, बांबू आणि खनिजांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी उद्योगाची जोड देण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र दळणवळणांच्या सुविधांमुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नव्हते. मात्र त्यांच्या कुटुंबातील वारस असलेले रतन टाटा यांनी ५ जोनवारीला चंद्रपुरात येऊन बांबू प्रशिक्षण केंद्र्राबाबत सामंजस्य करार केला. एवढेच नाही तर, चंद्रपूरच्या विकासात पाठीशी राहण्याचा शब्द देवून भविष्यामध्ये देशात चंद्रपूर शहर पुढे जाईल, असा शुभसंकेतही आपल्या मनोगतातून दिला. औद्योगिक क्षेत्रात अग्रक्रमावर असलेल्या टाटा उद्योगसमूहाकडून मिळालेल्या या शब्दामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व आता लवकरच सुरू होणार असल्याचा आशावाद जिल्हावासीयांच्या मनात निर्माण झाला आहे. चंद्रपूरच्या क्लब ग्राऊंडवर हजारो जनमानसांच्या साक्षीने बांबूंच्या खुर्चीवर बसून अभिनव पध्दतीने बांबू प्रशिक्षण केंद्राच्या सामंजस्य करारावर टाटा उद्योग समूहाचे व्यंकटरमनन व मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर हा करार रतन टाटा व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केला, त्या प्रसंगी कडाडणाऱ्या टाळ्यांतून जणू उद्याच्या विकासपर्वाचे स्वागत झाले. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर रतन टाटा यांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पांचे आणि घोट (जि. गडचिरोली) येथील प्रकल्पाने तयार केलेल्या बांबू उत्पादनांची पहाणी केली. जंगलाचा जिल्हा असलेल्या या मातीत त्यांचे स्वागतही वन्यप्राणी आणि पक्षांची वेषभुषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी पुस्तके देऊन वनभुमीला साजेसे असे केले. वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रतन टाटा यांच्यासह अन्य पाहुण्यांना वाघाच्या प्रतिकृती भेट देवून हा जिल्हा पाहुण्यांच्या आठवणीत राहील याची काळजी घेतली. चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास विशद करणारी चित्रफीत, बांबु प्रशिक्षण केंद्र्राचे स्वरूप विशद करणारी चित्रफीत, सुक्ष्म नियोजन प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर विविध योजना व प्रकल्पांबाबतची चित्रफीत, सजविलेला सभामंच, काढलेल्या रांगोळया यामुळे हा समारंभ देखणा ठरला. (जिल्हा प्रतिनिधी)