-----------------------------------
सिंदेवाही - बहुजन विध्यार्थी संघटना सिंदेवाही ,युवा सामाजिक ब्रिगेड संस्था नवरगाव व बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीचे वतीने संत गाडगेबाबा स्म्रुतिदिना प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय संत गाडगेबाबा परिक्षेत सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही ,भारत विद्यालय नवरगाव , व ज्ञानेश ज्युनिअर कालेज नवरगाव या शाळांनी अनुक्रमे सावित्रीमाई फूले पुरस्कार ,भारतरत्न डा .आंबेडकर पुरस्कार व जिजाऊ पुरस्कारच्या प्रथम,द्वितीय व त्रूतिय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत .
या तालुकास्तरीय परिक्षेत बहुपर्यायी व वस्ठुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते .सिंदेवाही तालुक्यातील इयत्ता नववी तें बारावी पर्यंतच्या विध्यार्थीसाठी ही परीक्षा करोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन घेण्यात आली होती .
सदर परिक्षेत प्रथम पुरस्काराचा मान सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीचिं जाणवी प्रणिल पोपटे हिने पट्काविला आहे .तर द्वितीय पुरस्कार भारत विद्यालय नवरगावच्या अमान अजीज शेख यांनी प्राप्त केला आहे .आणि त्रूतिय पुरस्कार ज्ञानेश ज्युनिअर कालेज नवरगावच्या योगीता रविंद्र सोनटक्के या विध्यार्थीनीने मिळविला आहे .
तर प्रोत्साहनपर आर्यनलेडी मायावती पुरस्कार व बिरसा मुंडा पुरस्कार अनुक्रमे सर्वोदय ज्युनिअर कालेज सिंदेवाहीची श्रावणी अरूण जाम्भुल्कर व महात्मा फूले विद्यालय सिंदेवाहीच्या गौरव हिवराज बोरकर यांनी मिळविला आहे .
या सर्व तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धक विध्यार्थीना अतिथीच्या हस्ते लवकरच एका कार्यक्रमात पुरस्कार व प्रशस्तिपत्र आयोजकांकडून प्रदान करण्यात येणार आहे ,असे कार्यक्रम आयोजक बहुजन विद्यार्थी संघटनाचे अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे ,युवा सामाजिक ब्रिगेड संस्थाचे अध्यक्ष अमोल निनावें व बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदु खोब्रागडे यांनी सयुन्क्तपणे कळविले आहे . महोदय ,
क्रुपया ,सदर व्रुत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावे ,ही विनंती !!!
स्णेहण्कीत ,
कार्यक्रम संयोजक
तालुकास्तरीय संत गाडगेबाबा परीक्षा