शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काहीही झाले की घे अँटिबायोटिक ! चुकीचा वापर ठरतोय जीवाणूंना ताकद देणारा; दुष्परिणाम वाढले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:29 IST

Chandrapur : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे. देशात बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू झपाट्याने वाढत आहेत. वेळीच सावध न झाल्यास साधे संसर्गही जीवघेणे ठरू शकतात, असा सल्ला जनरल फिजिशन डॉ. विनोद नगराळे यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिरोधाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. दरम्यान, एका अहवालानुसार भारतातील तब्बल ८३ टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑरगॅनिझम (एमडीआरओ) म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू आढळून आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काहीही झाले की घे अँटिबायोटिक !

ताप, सर्दी, खोकला किंवा अंगदुखी झाली की अनेकजण थेट अँटिबायोटिक घेतात. मात्र बहुतेक वेळा हे आजार व्हायरल असतात आणि त्यात अँटिबायोटिकची गरज नसते.

जीवाणूंमध्ये आला तगडा प्रतिरोध

वारंवार अँटिबायोटिक वापरामुळे जीवाणू अधिक शक्तिशाली होते. त्यामुळे एकाच औषधाचा परिणाम पुन्हा होत नाही.

औषधांची मात्रा वाढवण्याची वेळ

जुनी औषधे परिणामकारक न ठरल्याने डॉक्टरांना जास्त डोस किंवा महागडी औषधे द्यावी लागत आहेत.

दहापैकी सहा रुग्णांवर परिणाम होईना

अनेक रुग्णांमध्ये सामान्य अँटिबायोटिक निष्प्रभ ठरत आहेत. दहापैकी सहा रुग्णांना अपेक्षित फरक जाणवत नाही, असे अहवालात आहे.

निमोनिया, मूत्रमार्ग संसर्गावर औषधे निकामी

निमोनिया व मूत्रमार्ग संसर्गासारख्या गंभीर आजारांमध्येही काही वेळा अँटिबायोटिक उपयोगी पडत नाही.

मनानेच औषधे न घेण्याचे मोदींचे आवाहन

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिबायोटिक घेऊ नका. आजचा चुकीचा वापर उद्याचे मोठे संकट ठरू शकतो."

अँटिबायोटिक वापराचे दुष्परिणाम काय ?

औषधांवर जीवाणूंचा प्रतिकार वाढतो, भविष्यात गंभीर संसर्गावर उपचार कठीण होतात, पोटाचे विकार, अॅलर्जीचा धोका वाढण्याची शक्यता असते.

अँटिबायोटिक कधी वापरावे, कधी नव्हे

जीवाणूजन्य संसर्गात डॉक्टर सांगतील तेव्हाच अँटिबायोटिक वापरावे. तर व्हायरल ताप, सर्दी, फ्लूमध्ये वापरू नये. डॉक्टरांनी सांगितलेली मात्रा व कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुनच उपचार घ्यावा. सतत अँटिबायोटिक घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

"अँटिबायोटिक म्हणजे सर्व आजारांवरची जादूची गोळी नाही. गरज नसताना घेतलेली अँटिबायोटिक औषधे जीवाणूंना अधिक ताकद देतात. यामुळे पुढे गंभीर संसर्ग झाला, तर प्रभावी औषध उपलब्ध राहत नाही. आज सर्दी-तापासाठी घेतलेली चुकीची गोळी उद्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे अँटिबायोटिक केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, योग्य मात्रेत घेणे हाच सुरक्षित मार्ग आहे."- डॉ. विनोद नगराळे, जनरल फिजिशन, चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Antibiotic overuse strengthens bacteria, increases side effects: A warning.

Web Summary : Overuse of antibiotics for minor ailments is creating drug-resistant bacteria. Doctors warn against self-medication; ineffective antibiotics pose serious health risks. Take antibiotics only when prescribed.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स