शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशासनाचे अविरत प्रयत्न सुरू होते. मात्र कोरोनाने यावर मात केलीच. आणि एक नव्हे तर एकाचवेळी या तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळून आले.

ठळक मुद्देनागभीड तालुका अलर्ट : परिसराचे निर्जंतुकीकरण व तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रविवारपर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या नागभीड तालुक्यात एकाचवेळी कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या संसर्गजन्य आजाराला रोखण्याचे मोठे आव्हान आता येथील प्रशासनासमोर आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरू केले आहे.नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशासनाचे अविरत प्रयत्न सुरू होते. मात्र कोरोनाने यावर मात केलीच. आणि एक नव्हे तर एकाचवेळी या तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळून आले.प्रशासनाने लागलीच त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यापासून तर त्या क्षेत्राला कंटनमेंट झोन जाहीर करून अवागमणास निर्बंध घातले आहेत. आरोग्य विभागाने त्वरेने पाऊल उचलत या चारही रूग्णांच्या संपर्कात जे जे व्यक्ती आले होते, त्यांचा सर्वे करून त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे सुरू केले आहे. याशिवाय कुनघाडा रीठ, वैजापूर, तळोधी व नागभीडच्या कंटेनमेंट झोनमध्ये सरसकट आरोग्य विषयक सर्वे सुरू केला आहे. दरम्यान तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी यांनी सोमवारी नागभीड येथील परिस्थितीची पाहणी केली.नागभीडमध्ये २४ तास लॉकडाऊननागभीड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना साखळी थांबविण्याच्या दृष्टीने सोमवारी सकाळी १२ वाजेपासून मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत नागभीड पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये व कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या