शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

बचतगट महिलांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST

अंगणवाड्यामध्ये बचत गटांमार्फत आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविण्यात येत असून नवनवीन बचतगटांना आहार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजुन्या गटांना डावलून नव्यांना कामे : काम न मिळाल्यास आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरवून नव्या बचतगटांना कामे देण्याच्या विरोधात बचतगटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जुन्या गटांना तातडीने कामे उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.अंगणवाड्यामध्ये बचत गटांमार्फत आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविण्यात येत असून नवनवीन बचतगटांना आहार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये संताप व्यक्त केला आहे. याविरोधात बचतगटाच्या महिलांनी राजेश पिंजरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रसंगी प्रा. रमेशचंद्र दहीवले, रेखा रामटेके यांच्यासह शेकडो बचतगटांच्या महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून जास्त कार्यालयापासून अंगवाड्यांना आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविले, नवनवीन बचतगटांना कामे देणे हा भ्रष्टाचार आहे. बचतगटाच्या खात्यावर २५ हजार रूपये डिपॉझिट राहण्याची अट २७ जानेवारीला शिथिल करण्यात आली. ती आता दहा हजार रूपये करण्यात आली, असे असतानाही तीन फेबु्रवारीला जी यादी प्रकल्प कार्यालयातर्फे लावण्यात आली. त्यावेळी २५ हजारांची अट हाच आधार पकडून पात्र, अपात्र बचगटाची यादी जाहीर करण्यात आली. ती अन्यायकारक आहे. घोषित केलेली यादी रद्द करावी, जुन्या बचगट महिलांना कामे देण्यात यावी, अशी मागणी राजेश पिंजरकर यांनी केली. आभार रेखा रामटेके यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनगेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्याचे काम बचतगटांच्या महिला करीत आहे. मात्र, आता जुन्या गटांना डावलून नव्या गटांना कामे देण्यात येत आहे. यामुळे जुन्या बचतगटांच्या महिलांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. जुन्या बचतगटांच्या महिलांना कामे देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.