शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनसाठी आधार कार्ड सक्तीचे

By admin | Updated: October 22, 2016 00:43 IST

नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे रेशनकार्डधारक लाभार्थी आधार कार्ड क्रमांक धान्य दुकानदारास उपलब्ध करुन देणार नाहीत,...

दुकानदाराकडे नोंदणी करण्याचे आवाहन : अन्यथा रेशनकार्ड होणार रद्द चंद्रपूर : नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे रेशनकार्डधारक लाभार्थी आधार कार्ड क्रमांक धान्य दुकानदारास उपलब्ध करुन देणार नाहीत, त्याचे नाव रेशन कार्डमधून वगळण्यात येवून त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व पिवळे व केशरी कार्डधारकांनी आधार क्रमांकाची दुकानदाराकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.१३ आॅक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ च्या योजनेअंतर्गत अन्नधान्य मिळत असलेल्या सर्व अंत्योदय, अन्न योजना व प्राधान्य कुटूंबाचे लाभार्थी कार्डधारकाच्या रेशन कार्डवर समाविष्ट सर्वच व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करण्यात येत आहे. आधार कायदा-२०१६ चे कलम ७ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट असलेल्या व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे.सद्य:स्थितीत जे लाभार्थी शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. त्यांच्या रेशनकार्डात समाविष्ट सर्व सदस्यांचे आधारकार्ड संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा केल्याची खात्री करुन घ्यावी. कुटूंबातील काही सदस्यांकडे आधार क्रमांक नसल्यास त्यांनी आधार केंद्रावर जावून आधार कार्ड नोंदणी करुन आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक दुकानदारास द्यावे. तसेच केंद्र शासनाने एलपीजी धारकांना सबसिडी सोडण्याबाबत केलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर या अधिनियमाअंतर्गत समाविष्ट पिवळे व केशरी कार्डधारकांनी रेशनवरील सवलतीच्या दरामध्ये मिळणाऱ्या अन्नधान्याची स्वत:साठी आवश्यकता नसेल तर त्यांना अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी स्वेच्छेने रेशनवरील अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय स्वीकारावा व तसे पत्र संबंधीत तहसिल कार्यालयास द्यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)